🚸 केशरी शिधापत्रिका धारकांना 25 एप्रिलपासून रास्‍तभाव धान्‍य दुकानातून सवलतीच्‍या दरात धान्‍य वितरण सूरू; जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, April 25, 2020

🚸 केशरी शिधापत्रिका धारकांना 25 एप्रिलपासून रास्‍तभाव धान्‍य दुकानातून सवलतीच्‍या दरात धान्‍य वितरण सूरू; जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम..

🚸 केशरी शिधापत्रिका धारकांना 25 एप्रिलपासून रास्‍तभाव धान्‍य दुकानातून सवलतीच्‍या दरात धान्‍य वितरण सूरू; जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम..

लॉकडाऊन कालावधीत मे आणि जून महिन्‍यांकरिता अंत्‍योदय व अन्‍नसुरक्षा योजनेत समावेश नसलेल्‍या उर्वरित केशरी शिधापत्रिका धारकांना 25 एप्रिलपासून रास्‍तभाव धान्‍य दुकानातून सवलतीच्‍या दरात धान्‍य वितरित करण्‍यात येणार असल्याची माहिती जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

शनिवार (ता. 25) पासून मे महिन्‍याचे धान्‍य दुकानातून उपलब्‍ध होणार असून, गहू 8 रुपये प्रति किलो, तांदूळ 12 रुपये प्रति किलो या दराने प्रति व्‍यक्‍ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ वितरित  करण्‍यात येणार आहे. 

पुणे शहरात केशरी शिधापत्रिकांची संख्‍या सुमारे 4 लाख 60 हजार असून, लाभार्थी संख्‍या सुमारे 20 लाख इतकी आहे.  पिंपरी-चिंचवडमध्‍ये हीच संख्‍या 2 लाख 65 हजार असून, लाभार्थी संख्या सुमारे 10 लाख इतकी आहे. मे महिन्‍यासाठी तीन हजार 887 टन गहू आणि 2 हजार 572 तांदूळ स्‍वस्‍त धान्‍य दुकानामध्‍ये पोहोच करण्‍यात आलेला आहे. या धान्‍याचे वाटप रेशनकार्डवर 25 एप्रिलपासून सुरु करण्‍यात येत आहे.

अंत्‍योदय व अन्‍नसुरक्षा लाभार्थ्‍यांना मे महिन्‍याचे धान्‍य वाटप 5 मे पासून करण्‍याचे नियोजन करण्‍यात आले आहे. रास्‍तभाव दुकाने पोलिसांच्‍या सूचनांप्रमाणे पूर्ण वेळ सुरु राहतील, असे जिल्‍हाधिकारी राम यांनी स्‍पष्‍ट केले. रास्‍तभाव धान्‍य दुकानांत पुरेसा धान्‍यसाठा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेला आहे. या धान्‍याचे वितरण लाभधारकांना 31 मे पर्यंत करण्‍यात येणार आहे. त्यामुळे धान्‍य घेण्‍यासाठी गर्दी करु नये, असे आवाहन त्‍यांनी केले. 

रेशनकार्ड धारकांसाठी हेल्‍पलाईन..
टोल फ्री क्रमांक : 1077
मदत केंद्र क्रमांक : 020- 26123746 (सकाळी 8 ते रात्री 8)
मोबाईल क्रमांक : 8149621169 किंवा 8605663866

टोकन पद्धतीने धान्‍य वाटप..
स्‍वस्‍त धान्‍य दुकानदारांनी कार्डधारकांना धान्‍य वाटप करण्‍यासाठी वेळापत्रक तयार केले आहे. कार्डधारकांना टोकन पद्धतीने धान्‍याचे वाटप करण्‍यात येणार आहे. टोकनवर कार्डधारकाने कोणत्‍या वेळी धान्‍य घेण्‍यासाठी यावे याची नोंद असेल. त्‍यानुसार दिलेल्‍या वेळेतच दुकानामध्‍ये जाऊन धान्‍य घ्‍यावे. लाभार्थ्‍यांनी धान्‍य घेताना सोशल डिस्‍टंस ठेवावा आणि मास्‍कचा वापर करावा, असे आवाहन अन्‍न धान्‍य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी केले आहे.

Post Bottom Ad

#

Pages