🚨 पुणे शहरात क्यूआरकोडचा अभिनव उपक्रम यशस्वी ठरत संचारबंदी व लॉकडाऊन आदेशाचे भंग करणार्या 267 वाहन चालकांवर कारवाई.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, April 2, 2020

🚨 पुणे शहरात क्यूआरकोडचा अभिनव उपक्रम यशस्वी ठरत संचारबंदी व लॉकडाऊन आदेशाचे भंग करणार्या 267 वाहन चालकांवर कारवाई..


🚨 पुणे शहरात क्यूआरकोडचा अभिनव उपक्रम यशस्वी ठरत संचारबंदी व लॉकडाऊन आदेशाचे भंग करणार्या 267 वाहन चालकांवर कारवाई..

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याकामी पुणे शहरात संचारबंदी व लॉकडाऊन आदेश लागू झाल्यानंतर अत्यावश्यक व अन्य सेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने ठराविक व्यक्तींना प्रवेशपत्र देण्याचा निर्णय घेतला होता. रस्त्यावर अन्य ठिकाणी जाण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा प्रवेशपत्रधारकाला पोलिसांकडून सूट मिळत होती. मात्र, काही प्रकरणात त्याचा गैरफायदा होत रस्त्यांवर जास्त गर्दी व्हायला लागल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने पुणे पोलीसांनी क्यूआरकोडचा अभिनव उपक्रम राबवत नागरिकांना प्रबोधन करत क्यूआरकोडच्या माध्यमातून नागरिकांना अत्यावश्यक व अन्य सेवा सुरळीत चालण्यासाठी प्रशासनाने ठराविक व्यक्तींना प्रवेशपत्र देण्याचा निर्णय हाती घेतला आहे.

पुणे शहरातील चौकाचौकात तैनात असणाऱ्या पोलिसांना चहापाणी देण्यासाठी स्वयंसेवक फिरतात. मात्र, एक लिटरचा थर्मास घेवून ठिकठिकाणी वाटपाचे सोंग करीत असल्याचा फसवा प्रकार उजेडात आला आहे. त्याचबरोबर औषधं घेण्याच्या नावाखाली देखील सर्रासपणे अशी टवाळकी सुरू आहे. त्यामुळे भाजी विक्रेते, पशूपालक, विशिष्ट वाहनचालक, पुणे अंतरशहरात प्रवास व अन्य स्वरूपात झालेले प्रवेशपत्राचे वाटप संचारबंदीचा फज्जा उडविणारे ठरले आहे. सवलत देण्याचा निर्णय झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी झाली. भरमसाठ प्रवेशपत्राचे गैरफायदा होत असल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आल्याने पोलीस प्रशासनाने यावर बोट ठेवत नाराजी व्यक्त करत क्यूआरकोडच्या माध्यमातून नागरिकांना अत्यावश्यक व अन्य सेवा सुरळीत चालण्यासाठी प्रशासनाने ठराविक व्यक्तींना प्रवेशपत्र देण्याचा निर्णय घेतल्याने पुणे शहरातील रस्त्यांवर गर्दी होण्याचे प्रमाण कमी झाले तसेच चौकाचौकात बदोबस्तात तैनात असणाऱ्या पोलिसांनी क्यूआरकोडची पाहणी करून रसत्यावर वाहने घेऊन फिरणार्या टवाळक्याची धरपकड करत बुधवारी दि.01 एप्रिल 2020 रोजी पुणे शहर वाहतूक शाखेद्वारे भारतीय दंड संहिता कलम 188 प्रमाणे 61 वाहन चालकांवर कारवाई केली तसेच पुणे शहरातील पोलीस स्टेशनद्वारे भारतीय दंड संहिता कलम 188 प्रमाणे 206 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे, असे एकूण 267 वाहन चालकांवर कारवाई करत वाहने जप्त केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages