🛅 देशात 3 मे पर्यंत लॉक डाऊन कायम.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, April 14, 2020

🛅 देशात 3 मे पर्यंत लॉक डाऊन कायम..


🛅 देशात 3 मे पर्यंत लॉक डाऊन कायम..

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांचा लॉकडाउन करण्यात आला होता. हा लॉकडाउन १४ एप्रिल रोजी संपणार असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात येत असल्याची घोषणा केली. दरम्यान, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने लॉकडाउनच्या काळात आपल्या सामूहिक शक्तीचं दर्शनच डाॅ.बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपण देशासाठी एका शिस्तबद्ध सैनिकाप्रमाणे आपलं कर्तव्य बजावत आहात. त्यामुळे मी आपल्या सर्वांचे आदरपूर्वक नमन करतो. आपल्या संविधानात ज्या ‘वुई द पिपल ऑफ इंडिया’ या शक्तीचा उल्लेख केला आहे, तो हाच तर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण भारताच्या जनतेच्यावतीनं आपल्या सामूहिक शक्तीचं दर्शन, संकल्प दाखवून द्यावा हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे..
कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने लॉकडाउन 3 मे पर्यंत कायम राहणार
20 एप्रिलपर्यंत प्रत्येक राज्यातील स्थितीचे मुल्यांकन करणार
आता कोरोनाचा प्रसार होणार नाही याची काळजी घेणे हि सर्वांची जबाबदारी आहे
लॉकडाउन वाढवा ही नागरिकांची मागणी आहे
सरकारकडून उद्या नवीन नियमावली जारी करणार
20 एप्रिलपर्यंत ज्या राज्यात नियंत्रण आणले जाईल, तेथील नियम शिथील केले जातील- मोदी.
लॉकडाउमुळे आर्थिक नुकसान होतेच, मात्र ते जनतेच्या जीवापेक्षा मोठे मानता येणार नाही
समस्या दिसता क्षणी आपण त्यावर उपाय करणे सुरू केले
अन्य देशांशी भारताची तुलना करणे योग्य नसले तरी देखील तुलनेने भारतातील करोनाबाधितांची संख्या ३० टक्क्यांनी कमी- मोदी.
एखाद्या सैनिकाप्रमाणे देशातील जनता कर्तव्य पार पाडत आहे
  देशव्यापी लॉकडाउनच्या काळात लोकांनी संयम पाळल्याचे दिसले

या सात गोष्टी जरूर लक्षात ठेवा..
1️⃣ घरातील ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या
2️⃣ लक्ष्मण रेखा ओलांडू नका;  सोशल डिस्टनसिंग, घरात बनवलेले मास्क वापरा
3️⃣ शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवा
4️⃣ आरोग्य सेतू अँप डाउनलोड करा व इतरांनाही याबाबत जागरूक करा
5️⃣ कोणालाही कामावरून काढू नका
6️⃣ गरीब परिवाराची काळजी घ्या त्यांना मदत करा
7️⃣ अत्यावश्यक सेवेतील लोकांचा सन्मान करा

Post Bottom Ad

#

Pages