😱 'तबलिगी जमात’मुळे देशभरात तब्बल 400 लोकांना कोरोनाची लागण.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, April 2, 2020

😱 'तबलिगी जमात’मुळे देशभरात तब्बल 400 लोकांना कोरोनाची लागण..

क्राईम  क्राईम क्राईम 

😱 'तबलिगी जमात’मुळे देशभरात तब्बल 400 लोकांना कोरोनाची लागण..

दिल्लीतल्या ‘तबलिगी जमात’मुळे देशभर कोरोना पसरला हे आता सिद्ध झालं. या कार्यक्रमात जे सहभागी झाले होते आणि त्यांच्या जे लोक संपर्कात आले होते अशा तब्बल 400 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. सर्वाधिक वेगाने हा व्हायरस पसरण्याचं हे देशातलं पहिलच उदाहरण आहे. या परिषदेत सहभागी झालेल्या आणि जमातचे कार्यकर्ते अशा 9 हजार जणांची ओळख पटविण्यात गृहमंत्रालयाला यश आलं आहे. यात 1306 जण विदेशी नागरीक असून त्या सगळ्यांना क्लारंटाइन करण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या वतीने आज देण्यात आली.

जमातच्या कार्यक्रमात गेलेले आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्यासाठी देशभर मोहिम राबविण्यात आली होती. त्यांच्या टेस्ट करण्यात आल्या. त्यातून ही माहिती पुढे आली आहे.

देशाची राजधानी सध्या कोरोनामुळे हादरली आहे. निजामुद्दीन दर्गा येथे आयोजित कार्यक्रमांमुळे तब्बल 9 हजार लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो, अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. मात्र आता याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कार्यक्रमात मौलाना साद यांनी लॉकडाउनमध्येही गर्दी जमवण्याचे लोकांना आवाहन केले.

मौलानाचा एक ऑडिओ सध्या व्हायरल होत आहे, यामध्ये ते, 'नमाज सुरू ठेवा आणि मर्काझमध्ये सामील व्हा. ही वेळ अल्लाहची क्षमा मागण्याची आहे', असे आवाहन लोकांना करत आहेत. मौलांना यांनी लोकांनी मशिदीत येत रहावे, असेही लोकांना सांगितले.

मौलांना साद यांचा हा ऑडीओ व्हायरल झाल्यानंतर ते भूमिगत झाले आहेत. हिंदी दैनिक ‘अमर उजाला’ च्या वृत्तानुसार, मौलाना साद यांच्या व्हायरल ऑडिओचा तपास दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सादर करण्यात आला आहे.

Post Bottom Ad

#

Pages