😱 पुण्यात ४ ठिकाणी कर्फ्यू जाहीर.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, April 7, 2020

😱 पुण्यात ४ ठिकाणी कर्फ्यू जाहीर..


😱 पुण्यात ठिकाणी कर्फ्यू जाहीर..

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुणे पोलीस प्रशासनाने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील खडक पोलीस स्टेशन, फरासखाना पोलीस स्टेशन, स्वारगेट पोलीस स्टेशन आणि कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत भागांमध्ये कर्फ्यू जाहीर केला आहे. आज सायंकाळी सात वाजल्यापासून येत्या १४ एप्रिलपर्यंत हा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्यामुळे या चारही भागातील नागरिकांच्या संचारावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाणे हद्दीतअर्गत मनाईचे आदेश लागू..

खडक पोलीस स्टेशन..
मक्का मस्जिद, यादगार बेकरी ते दलाल चौक - मोहसिन जनरल स्टोअर्स - शमा फॅब्रीकेशन - शहीद भगतसिंग चोक - उल्हास मित्रमंडळ - राजा टॉवर - इम्युनल चर्चची मागील बाजू - हाजी इसाक शेख उदोन पथ - पुष्मम ज्वेलर्स मंगल क्लब जवळ महाराणा प्रताप रोड - मिठगंज पोलीस चौकी - रॉयल केटरर्स समोरील बोळ - जाहीद लेडीज टेलर्स - चाँदतारा चोक - मदिना केटरर्स - घोरपडे पेठ पोलीस चोकी - इकबाल स्क्रेप सेंटर या ठिकाणांचे आतील परिसर.

फरासखाना पोलीस स्टेशन..
१) मंगळवार पेठ - कागदीपूरा - ३३०, मंगळवार पेठ - १५७, मंगळवार पेठ - गाडीतळ चौक - कामगार पुतळा रोड - २२०, मंगळवार पेठ - २२४, मंगळवार पेठ - २२६, मंगळवार पेठ.
२) रविवार पेठ - गोविंद हलवाई चोक - हमजेखान चौक - गुरुब्दारा रोड - देवजीबाबा चोक.

स्वारगेट पोलीस स्टेशन..
१) मीनाताई ठाकरे वसाहत कमान - महानगरपासून ते गिरीधर भवन चौकापर्यंतच्या रस्त्याचा डावीकडील भाग.
२) महावीर प्रतिष्ठानपासून राधास्वामी सत्संग व्यासकडे जाणा-या रस्त्याचे डाव्या बाजूस असलेले सुर्यमूखी गणेश मंदिर पासून पुढे राधास्वामी सत्संग व्यासपर्यंतची डावीकडील बाजू.
३) राधास्वामी सत्संग व्यासपासून डायस प्लॉट चोकाकडे जाणान्या रस्त्यावरील डायस प्लोट चोका पर्यंतचा डाव्या बाजूचा खिलारे वस्ती व पी अॅण्ड टी कॉलनी यांचे सीमा भितीपर्यंतचा भाग व राधास्वामी सत्संग व्यासपासून डायस प्लॉट चौकाकडे जाणान्या रस्त्यावरील डायस प्लॉट चोकापर्यंतचा उजव्या बाजूचा भाग.
४) डायस प्लॉट चोक ते सेवन लकज चोकाकडे जाणान्या रस्त्यावरील डायस प्लोटपर्यंतचा रस्त्याचा उजवीकडील भाग.
५) डायस प्लॉट चोकाकडून लक्ष्मी नारायण चोकाकडे (सातारा रोड) जाणान्या रस्त्याचा डायस प्लॉट चौकापासून मीनाताई ठाकरे वसाहत कमानपर्यंतचा डावीकडील भाग.
६) गिरीधर भवन चौक ते डायस प्लॉट चोक या रस्त्याच्या उजव्या व डाव्या बाजूचा भाग.
७) डायस प्लॉट चौक ते राधास्वामी सत्संग व्यास दरम्यानचा रस्ता.

कोंढवा पोलीस स्टेशन..
अशोका म्युज सोसायटी - आशीर्वाद चौक, मिठानगर - सत्यानंद हॉस्पिटल गल्ली - भैरोबा मंदीर पी.एम.टी. बस स्थानक - संत गाडगे महाराज शाळा - साई मंदीर ब्रम्हा अॅव्हेन्यू सोसायटी - शालीमार सोसायटी - कुमार पृथ्वी गंगाधाम रोड - मलीक नगर.

त्याचबरोबर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी फक्त जीवनावश्यक घटक वगळता या भागातील दुकाने सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेतच खुली राहणार आहेत. तसेच, गर्दी वाढली तर दुकाने बंद करण्यात येतील. महत्त्वाचं म्हणजे दुकानं कधी उघडी ठेवायची याची वेळ पोलीस ठरवणार आहेत.

तसेच, जीवनावश्यक घटकांमध्ये मेडिकल दुकाने व रूग्णालये याचा समावेश करण्यात आला आहे. तर इतर घटकामध्ये भाजीपाला, किराणा दुकाने यांचा समावेश आहे. त्यामुळे फक्त सकाळी दहा ते दुपारी बारा या दोन तासांच्या कालावधीत नागरिकांना गरज पडल्यास जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे.

Post Bottom Ad

#

Pages