🚨मॉर्निंग वॉकला निघालेल्या 51 जणांविरोधात बिबवेवाडी पोलिसांची कारवाई.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, April 16, 2020

🚨मॉर्निंग वॉकला निघालेल्या 51 जणांविरोधात बिबवेवाडी पोलिसांची कारवाई..


🚨 मॉर्निंग वॉकला निघालेल्या 51 जणांविरोधात बिबवेवाडी पोलिसांची कारवाई..

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारने दुसऱ्यांदा लॉकडाउन व संचारबंदी जाहीर करुन नागिरकांना घरातच राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत. या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलीस प्रशानसन दिवसरात्र कर्तव्य बजावत आहे. मात्र तरी देखील काही नागरिका याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहेत. अशा नागरिकांविरोधात पोलीस प्रशासन कारवाई करत आहे. याच पार्श्वभूमीवर मॉर्निंग वॉकला निघालेल्या 51 जणांविरोधात बिबवेवाडी पोलिसांनी कारवाई केली आहे.

घराबाहेर न पडण्याचे आदेश दिलेले असताना ही बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे हद्दीतील स्त्यांवरुन मॉर्निंग वॉकला निघालेल्या तब्बल 50 जणांना बिबवेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

पुणे शहरात कोरोना प्रादुर्भावामुळे दुसऱ्यांदा लागू झाले असून सुद्धा काही नागरिक घराबाहेर जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्यानंतर गूरूवारी पहाटे सात वाजेपासून मा.पोलीस सहाय्यक आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री. सुनील कलगुटकर यांच्या मार्गदर्शनानुसार बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे मा.वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. कुमार घाडगे यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके स्थापन करुन पहाटे रस्त्यावर फिरणार्याची धरपकड करण्यात आली.

विशेष म्हणजे पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या नागरिकांपैकी अनेकजण उच्चशिक्षित आहेत. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतल्यावर त्यांना बिबवेवाडी पोलीस ठाणे आवारातील रस्त्यावर दोन तास योगाचे धडे स्वतः बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे मा.वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. कुमार घाडगे यांनी दिले. त्यानंतर संबंधित  नागरिकांवर भारतीय दंड संहिता 188 प्रमाणे रीतसर कारवाई केल्यानंतर त्यांना समज देवून घरी पाठवण्यात आले.

Post Bottom Ad

#

Pages