😷 मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह 53 पैकी 31 पत्रकाराचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आल्याने देण्यात आला डिस्चार्ज.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, April 27, 2020

😷 मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह 53 पैकी 31 पत्रकाराचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आल्याने देण्यात आला डिस्चार्ज..


😷 मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह 53 पैकी 31 पत्रकाराचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आल्याने देण्यात आला डिस्चार्ज..

मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह ठरलेल्या 53 पैकी 31 पत्रकार-फोटोग्राफरचे रिपोर्ट आज ‘कोरोना निगेटिव्ह’आले आहेत. त्यामुळे त्यांना गोरेगावच्या हॉटेलमधील क्वारंटाइनमधून डिस्चार्ज देण्यात आला असून चौदा दिवस होम क्वारंटाइन राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार पालिका प्रशासनाने पत्रकारांसाठी कोरोना चाचणी शिबीर घेतले होते.

कोरोनाविरोधात आरोग्य सेवेतील कर्मचार्‍यांबरोबरच इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मुंबईकरांना सेवा देण्यासाठी झटत आहेत. यामध्ये कोरोनाबाबत सर्व प्रकारच्या बातम्या देण्याचे महत्त्वपूर्ण काम शेकडो पत्रकार अविरतपणे करीत आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकार-फोटोग्राफरची कोरोना चाचणी करावी अशी मागणी टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन, मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली होती. यानुसार पालिकेच्या माध्यमातून 16 आणि 17 एप्रिल रोजी 171 पत्रकार, फोटोग्राफर, व्हिडिओ जर्नालिस्ट यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचण्यांचा अहवाल 20 एप्रिल रोजी आल्यानंतर यात 53 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले होते. मात्र यामध्ये यामधील अनेकांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. त्यामुळे कोरोनाची लक्षणे नसलेल्या सुमारे 40 पत्रकारांना गोरेगावमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. तर ज्यांना इतर आजार आहेत त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवता यावे यासाठी अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर आणि आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांच्या निर्देशानुसार पत्रकारांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

म्हणूनच दिला डिस्चार्ज..
कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असला तरी अनेकांमध्ये कोणतेही लक्षणे दिसत नव्हती. तरीदेखील पालिकेने क्वारंटाइन केलेल्या संबंधित पत्रकारांच्या आरोग्याची काळाजी घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचार्‍यांची टीम 24 तास क्वारेंटाइन हॉटेलमध्ये तैनात ठेवण्यात आली होती. यातच 24 एप्रिल रोजी पुन्हा सर्व पत्रकारांची कोरोना चाचणी करण्यात आली. याचे रिपोर्ट 48 तासांनी आज आले. यामध्ये 31 जणांचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती संबंधित पत्रकार, पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

Post Bottom Ad

#

Pages