🚨पुण्यात अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाच्या गोदामावर पोलिसांचा छापा;5,71,740/- रुपये किमतीचा गुटखा जप्त.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, April 18, 2020

🚨पुण्यात अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाच्या गोदामावर पोलिसांचा छापा;5,71,740/- रुपये किमतीचा गुटखा जप्त..🚨 पुण्यात अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाच्या गोदामावर पोलिसांचा छापा ;5,71,740/- रुपये किमतीचा गुटखा जप्त..

पुणे शहरातील तळजाई पठार, धनकवडी येथील एका गोदामावर पोलिसांनी छापा टाकून 5 लाख 71 हजार 740 रुपये किमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त केला ही कारवाई पोलिसांनी शुक्रवार दिनांक 17 एप्रिल रोजी दुपारी एकच्या सुमारास केली आहे.

गुटखा साठवणूक केल्याची गुप्त माहिती समजल्यावर दोन पोलिस पथकांनी एकत्रितपणे तळजाई पठार धनकवडी मधील एका घरावर छापा टाकला त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारच्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाच्या पुड्यांचा अवैधरित्या साठा आढळून आला.

पोलिसांनी घेतले एकास ताब्यात ..
सहकारनगर पोलिसांनी 5 लाख 71 हजार 740 रुपये किमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त करून संशयित सुभाष हरिभाऊ घुगे (वय 55, रा.तळजाई पठार, धनकवडी, पुणे) यास ताब्यात घेत त्याच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त यांचे आदेश क्रमांक असुमाअ/अधिसुचना - 901/7 दि.19/07/2019 व भारतीय दंड विधान कलम 188, 272, 273 चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.
सदर घटनेचा पुढील तपास सहकारनगर पोलीस ठाण्याचे मा.पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजय पुराणिक करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी देशात दुसऱ्यांदा लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे या पार्श्‍वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी सर्व दुकाने आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश देत सर्व नागरिकांना घरी राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत दरम्यान शुक्रवार दि.17 एप्रिल 2020 रोजी संशयित सुभाष हरिभाऊ घुगे (वय 55, रा.तळजाई पठार, धनकवडी, पुणे) हा त्याच्या गोदामात, गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखु याचा साठा केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून वेगवेगळ्या प्रकारच्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाच्या पुड्यांचा अवैधरित्या साठा केलेला मिळुन आला. महाराष्ट्र राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त यांचे आदेश क्रमांक असुमाअ/ अधिसुचना 901/7 दि.19/07/2019 चे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्याने भारतीय दंड विधान कलम 188 चे उल्लंघन केले आहे. सदर प्रतिबंधित साठा हा जन आरोग्याच्या दृष्टीने असुरक्षित असल्याने विक्री,वाहतूक, साठा, उत्पादन, वितरण याकरिता प्रतिबंधित केला आहे. प्रतिबंधित पदार्थसेवन केल्याने मुखाचा कर्करोग, ओरल सबम्युकास फायब्रोसिस, गुणसूत्रातील विलाग्र इत्यादी शारीरिक हानी होत असल्याने संशयित सुभाष हरिभाऊ घुगे यांनी भारतीय दंड विधान कलम 272, 273 चे उल्लंघन केल्याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

गुटख्याच्या कारवाई उरल्या फक्त नावालाच ..
शासनाने नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी प्रतिबंधक केलेल्या विविध प्रकारच्या गुटखा, सुगंधित मसाला युक्त तंबाखूजन्य पदार्थावर शहरात विक्रीसाठी कधीच प्रतिबंधक दिसला नाही. त्यामुळे गल्ली-बोळातील दुकानासह बहुतेक किराणा दुकान, पानपट्टी इत्यादी ठिकाणी गुटख्याचा सर्व प्रकारच्या गुटखा, सुगंधित तंबाखूजन्य पदार्थाच्या पुड्या ग्राहकांना बिनदिक्कत उपलब्ध होतात. याकडे संबंधित जबाबदार यंत्रणा मात्र कानाडोळा करत असल्याचे दिसते. पोलीस अधून-मधून गुटखा माफियांच्या विरोधात कारवाई करतात मात्र पुढे तो जामिनावर सुटल्यावर पुन्हा तेच "येरे माझ्या मागल्या" सारखी बनते.

Post Bottom Ad

#

Pages