😱 पुणे शहरात करोना बळींची संख्या 59; मागील 24 तासांत आणखी 4 बळी.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, April 23, 2020

😱 पुणे शहरात करोना बळींची संख्या 59; मागील 24 तासांत आणखी 4 बळी..


😱 पुणे शहरात करोना बळींची संख्या 59; मागील 24 तासांत आणखी 4 बळी..

पुणे शहरात मागील 24 तासांत आणखी 4 जणांचा करोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 59 वर जावून पोहोचली आहे. या तिघांनाही वेगवेगळे आजार होते तर, गेल्या 48 तासांत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात मृत्यूचा कहर सुरूच असून, तीनही मृत ससून रुग्णालयातील आहे, दरम्यान गेल्या चोवीस तासांत शहरात नवीन करोनाबाधित 64 इतके रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

वय वर्षे 53 ते 65 वयोगटातील हे मृत रुग्ण असून, एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. हडपसर येथे राहणारे 53 वर्षीय 17 एप्रिल रोजी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांना उच्च रक्‍तदाब आणि वजन अधिक (जाड) असल्यामुळे त्यांचा 21 एप्रिल रोजी रात्री अकरा वाजता मृत्यू झाला. तर बुधवारी दिवसभरात एक महिला आणि पुरुषाचा मृत्यू झाला.

भवानी पेठेत राहणाऱ्या 56 वर्षीय महिलेला 20 एप्रिल रोजी ससून रुग्णालयात दाखल केले होते. तर पर्वती दर्शन येथे राहणारे 65 वर्षीय व्यक्‍तीला भवानी पेठेत राहणाऱ्या 56 वर्षीय महिलेला 20 एप्रिल रोजी ससून रुग्णालयात दाखल केले होते. तर पर्वती दर्शन येथे राहणारे 65 वर्षीय व्यक्‍तीला 19 एप्रिल रोजी त्रास होत असल्यामुळे ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, या दोघांना वेगवेगळे आजार असल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

Post Bottom Ad

#

Pages