🚨 पुणे शहरात लॉकडाऊन व संचारबंदी काळात विनाकारण अनावश्यकपणे रोडवर वाहन चालवणा-या वाहनचालकांवर कारवाई.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, April 2, 2020

🚨 पुणे शहरात लॉकडाऊन व संचारबंदी काळात विनाकारण अनावश्यकपणे रोडवर वाहन चालवणा-या वाहनचालकांवर कारवाई..


🚨 पुणे शहरात लॉकडाऊन व संचारबंदी काळात विनाकारण अनावश्यकपणे रोडवर वाहन चालवणा-या वाहनचालकांवर कारवाई..
कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी संपुर्ण देशात करण्यात आलेले लॉकडाऊन तसेच पुणे शहरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस सह आयुक्त,पुणे शहर यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ चे कलम १४४ (१) (३) प्रमाणे याहन वापरास व वाहतुकीस मनाई आदेश पारीत केले आहेत.सदर कालावधीत अत्यावश्यक सेवेतील वाहने व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच वैद्यकीय तातडीचे कामाकरीता पोलीसांकडून तात्पुरत्या स्वरूपात देण्यात येणा-या पासेसची वाहने यांना शहरात ये-जा करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे.
शहरात लॉकडाऊन अमलात आल्या पासून पुणे शहर पोलीस दलाकडून नागरीकांनी लॉकडाऊन व संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करु नये याकरीता वाहतुक शाखेचे मा.अपर पोलीस आयुक्त श्री. डॉ . संजय शिंदे यांच्या निरीक्षणाखाली पुणे शहरातील १३ ठिकाणी नाकाबंदीचे पॉईंट लाऊन वाहने चेक केली जात असतांना गुरुवार दि.०२ एप्रिल २०२० रोजी रात्री ०७.०० वा.पर्यंत पुणे शहरामध्ये काही नागरीक हे विनाकारण अनावश्यकपणे रस्त्यावर वाहने चालवित असतांना मिळून आल्याने त्यांच्यावर पुणे शहर वाहतुक शाखा व पोलीस ठाणे पोलिसांनकडून कारवाई करण्यात आली आहे.
पुणे शहर वाहतुक शाखा व पोलीस ठाणे पोलिसांनकडून पुढील कारवाई..
पुणे वाहतुक शाखा पोलिसांनी भा.द.वि.कलम १८८ अन्वये नूसार पुणे शहरातील १३५ लोकांनवर कारवाई करण्यात आली आहे.

पुणे पोलीस ठाणे पोलिसांनी भा.द.वि.कलम १८८ अन्वये नूसार पुणे शहरातील १८२ लोकांनवर कारवाई करण्यात आली आहे.

भा.द.वि.कलम १८८ अन्वये प्रमाणे पुणे शहरातील ४०६ लोकांना नोटीस देण्यात आली आहे.

भा.द.वि.कलम १८८ अन्वये प्रमाणे पुणे शहरातील लोकांना नोटीस देऊन ४३६ वाहने जप्त करण्यात आली आहे.

मा.अपर पोलीस आयुक्त वाहतुक विभाग पुणे शहर श्री. डॉ. संजय शिंदे यांचे नागरीकांना आवाहन..
नागरीकांना याद्वारे असे आवाहन करण्यात येते की, पुणे शहरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याकडून प्रशासनाकडून सर्व नागरीकांना वेळोवेळी सुचना देण्यात येत आहे. प्रादुर्भाव रोखन्यासाठी नागरीकांनी घरात थांबणे आवश्यक आहे व कायद्याचे पालन अनिवार्य आहे.

Post Bottom Ad

#

Pages