😱 धक्कादायक घटना..लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी अडवले म्हणून त्यांनी पोलिसाचा हातच कापला.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, April 12, 2020

😱 धक्कादायक घटना..लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी अडवले म्हणून त्यांनी पोलिसाचा हातच कापला..


😱 धक्कादायक घटना..लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी अडवले म्हणून त्यांनी पोलिसाचा हातच कापला..

लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्या एका टोळक्याला पोलिसांनी अडवले म्हणून त्यातील एकाने पोलिसाचा हात तलवारीने कापल्याची धक्कादायक घटना पंजाबमधील पतियाळा शहरात रविवारी सकाळी घडली आहे. हरजीत सिंह असे त्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

In an unfortunate incident today morning, a group of Nihangs injured a few Police officers and a Mandi Board official at Sabzi Mandi, Patiala. ASI Harjeet Singh whose hand got cut-off has reached PGI Chandigarh: Dinkar Gupta, Director General of Police (DGP) Punjab (in file pic) pic.twitter.com/6elj2QYYBv

— ANI (@ANI) April 12, 2020

पतियाळा शहरातील भाजी बाजारात गाडीवरून फिरणाऱ्या एका टोळक्याला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र त्यांनी गाडी न थांबवता पोलीस बॅऱिकेट्सला नेऊन ठोकली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी गाडीतील तलवारी, लोखंडी रॉड काढून पोलिसांवर हल्ला केला. .यात चार पोलीस जखमी झाले तर एका पोलीस अधिकाऱ्याचा हात कापला गेला. त्यानंतर ते टोळके तेथून पसार झाले.

I have spoken to Director of PGI who has deputed top plastic surgeons of PGI for surgery, which just started. The Nihang group will be arrested and further action will be taken soon: Dinkar Gupta, Director General of Police (DGP) Punjab https://t.co/y2DGaqYAbw

— ANI (@ANI) April 12, 2020

पंजाबचे पोलीस महानिरिक्षक दिनकर गुप्ता यांनीा या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येणार असल्याची माहिती दिनकर गुप्ता यांनी दिली. पोलीस उपनिरिक्षक हरजीत सिंग यांचा तुटलेला हात शस्त्रक्रिया करुन पुन्हा जोडण्यात येणार आहे.

Post Bottom Ad

#

Pages