👌 पुण्यात "नवग्रह जैनसेवा मंडळ" सामाजीक संस्थेच्या माध्यमातून वाहतूक पोलीसांच्या हस्ते गरजवंतांना अन्न-धान्य व जेवणाचे वाटप.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, April 10, 2020

👌 पुण्यात "नवग्रह जैनसेवा मंडळ" सामाजीक संस्थेच्या माध्यमातून वाहतूक पोलीसांच्या हस्ते गरजवंतांना अन्न-धान्य व जेवणाचे वाटप..


👌 पुण्यात " नवग्रह जैनसेवा मंडळ " सामाजीक संस्थेच्या माध्यमातून वाहतूक पोलीसांच्या हस्ते गरजवंतांना अन्न-धान्य व जेवणाचे वाटप..
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. मात्र लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणारे मजूर, स्थलांतरित कामगार, हॉस्टेलचे विद्यार्थी व बेघर अशा लोकांवर मोठा परिणाम झाला. याच पार्श्वभूमीवर नवग्रह जैनसेवा मंडळ पुणे या सामाजीक संस्थेने १ एप्रिल पासून दरदिवशी तयार जेवणाचे ५०० पाकीटे व अन्न-धान्यचे वाटप गरीब गरजवंत नागरिकांना करण्यात येत आहे.

पुणे शहरात नवग्रह जैनसेवा मंडळ पुणे या सामाजीक संस्थेच्या माध्यमातून " एक हात मदतीचा " या उपक्रमा अंतर्गत बिबवेवाड़ी, प्रेम नगर येथील ४५ गरजवंत कुटुंबाना सहकारनगर वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रविण भोपळे , पोलीस हवलदार श्री. राजेंद्र पाटील , पोलीस शिपाई श्री. प्रविण ठाकरे यांच्या हस्ते अन्न-धान्यचे वाटप करण्यात आले.

दरम्यान लॉकडाऊन काळात नियमांचे व मार्गदर्शक तत्वांचे पालन करत सोशल डिस्टनसिंगचे काटेकोरपणे पालन करून नवग्रह जैनसेवा मंडळ पुणे या सामाजीक संस्थेचे अध्यक्ष श्री.किशोर जैन, संस्थेचे कार्यकर्ते श्री.पंकज परमार, श्री.शीतल जैन, श्री.आनंद जैन, श्री.अतिन राठोड, श्री.प्रीतम गांधी, श्री.रंजीत जैन, श्री.सचिन ओसवाल, श्री.संजय ओसवाल, श्री.जितेंद्र जैन, श्री.बंटी जैन, श्री.विनय पोरवाल व सदस्य यांनी ५०० तयार जेवणाचे पाकीटे शंकरसेठ रोड, काशेवाडी, गुरुवार पेठ येथील गोरगरीब गरजवंत नागरिकांना वाटप करण्यात आले आहे.

Post Bottom Ad

#

Pages