👌कोंढवातील शिवसेना शाखा व आई प्रतिष्ठानच्या वतीने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पीपीई सुरक्षा साधन संचाच्या किटचे वाटप.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, April 21, 2020

👌कोंढवातील शिवसेना शाखा व आई प्रतिष्ठानच्या वतीने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पीपीई सुरक्षा साधन संचाच्या किटचे वाटप..


👌 कोंढवातील शिवसेना शाखा व आई प्रतिष्ठानच्या वतीने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पीपीई सुरक्षा साधन संचाच्या किटचे वाटप..
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु असल्याने पोलीस यंत्रणेचा ताण वाढला आहे. लॉकडाऊनमध्ये पोलीस चौकाचौकात कर्तव्य बजावत कोरोना संसर्गाचा मुकाबला करत आहेत. त्यांना आरोग्याची काळजी घेता यावी, यासाठी शिवसेनेचे हडपसर मतदार संघाचे माजी.आमदार श्री.महादेव बाबर यांच्या हस्ते कोंढवा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस तसेच कोंढवा पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना शिवसेना शाखा कोंढवा व आई प्रतिष्ठानच्या वतीने पीपीई किट (सुरक्षा साधन संचाचे किट) वाटप करण्यात आले.
कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत असतांना त्यांचा अधिकाधिक जनसंपर्क होत असतो. त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्याने कोंढवातील शिवसेना शाखा व आई प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने पीपीई किट (सॅनिटायझर, मास्क, लिक्वीड सोप, साबण) असे सुरक्षा साहित्याचे शिवसेनेचे हडपसर मतदार संघाचे माजी.आमदार श्री.महादेव बाबर यांनी सामाजिक बांधीलकी जपत कोंढवा पोलीस स्टेशनचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड यांच्याकडे पीपीई किट सुपूर्त केले.
सुरक्षा साधन संचाचे पीपीई किटच्या वितरणवेळी, कोंढवा पोलीस स्टेशनचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड, शिवसेनेचे हडपसर मतदार संघाचे माजी.आमदार श्री.महादेव बाबर, माजी.नगरसेवक श्री.भरत आप्पा चौधरी, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.प्रसाद महादेव बाबर, सामाजिक कार्यकर्ते श्री.समीर पठाण, श्री.नदीम शेख, श्री.अजीज शेख, श्री.माऊली भोईटे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post Bottom Ad

#

Pages