🚨 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर घरफोडीच्या दाखल गुन्ह्यातील आरोपीला कोंढवा पोलीसांनी कर्नाटक राज्यातून केली अटक; ३३ तोळे वजनाचे दागिने केले जप्त.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, April 12, 2020

🚨 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर घरफोडीच्या दाखल गुन्ह्यातील आरोपीला कोंढवा पोलीसांनी कर्नाटक राज्यातून केली अटक; ३३ तोळे वजनाचे दागिने केले जप्त..


🚨 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर घरफोडीच्या दाखल गुन्ह्यातील आरोपीला कोंढवा पोलीसांनी कर्नाटक राज्यातून केली अटक; ३३ तोळे वजनाचे दागिने केले जप्त..

कोरोना विषाणुचा प्रार्दुभावमुळे संपुर्ण भारत देशामध्ये लॉकडावुन करण्यात आले आहे याअनुषंगाने मा.सहपोलीस आयुक्त पुणे शहर श्री.डाॅ.रवींद्र शिसवे यांनी सी.आर.पी.सी १४४(१३) नुसार पुणे शहरात संचारबंदीचे आदेश पारित करण्यात आले आहेत अश्या गंभीर परिस्थीतीमध्ये कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार मिळालेल्या प्राप्त माहितीच्या आधारे कोंढवा गुन्हे प्रगटीकरण शाखाचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी उत्कृष्ठ कामगिरी करत कर्तव्य पार पाडत कोंढवा पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील घरफोडीच्या दाखल गुन्ह्यातील आरोपीस कर्नाटक राज्यातून अटक करत दाखल गुन्हयांतील ३३ तोळे वजनाचे दागिने जप्त करुन घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

घरफोडीच्या दाखल गुन्हयांतील आरोपी काशिनाथ चंद्रकांत गायकवाड (वय.२८ रा.सध्या रा.बुध्द मंदीरा जवळ,किरकटवाडी,पुणे. मूळगाव रा. बलरगी,ता.अफजलपुर,जि.गुलबर्ग,राज्य-कर्नाटक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

घरफोडीच्या दाखल गुन्हा..
कोंढवा पोलीस ठाणे पुणे शहर येथे इंसम नामे संदिप मारुतीराव बधे (वय ४९, रा. बधेनगर, खडीमशीन चौकीजवळ, कोंढवा बुद्रुक, पुणे) हे दिनांक २० डिसेंबर २०१९ रोजी शिवाजी नगर येथे कामानिमीत्त गेले असता त्यांचे घराचे पहिल्या मजल्यावरील लोखंडी शटरचे लॉक तोडून व दरवाजाचे लॅच तोडून घरात प्रवेश करून बेडरुममधील कपाटात ठेवलेले सोन्याचे, चांदीचे दागिने व रोख रक्कम असे एकूण ९,७३,०००/- (अक्षरी रक्कम रुपये नऊ लाख त्र्याहत्तर हजार ) रूपये किंमतीचा माल घरफोडी करुन चोरुन नेल्या प्रकरणी फिर्यादी संदिप बधे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोढवा पोलीस ठाणे येथे गु.र.न १००१/१९ भादवि कलम ४५४,३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घरफोडीच्या दाखल गुन्ह्यातील आरोपीस अटक..
कोंढवा पोलीस ठाणे येथील दाखल गुन्हयांतील आरोपी हा बलरगी गाव, ता.अफजलपुर, जि.गुलबर्गा, राज्य-कर्नाटक, येथे असल्याची खात्रीशीर माहिती कोंढवा गुन्हे प्रगटीकरण शाखाचे पोलीस उपनिरीक्षक श्री.संतोष शिंदे यांना माहिती प्राप्त होताच लागलीच त्यांनी दाखल गुन्हयांतील आरोपीतांस अटक करण्याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड, कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.महादेव कुंभार पोउनि शिंदे यांना कळवत त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार गुन्हे प्रगटीकरण शाखाचे पोलीस उपनिरीक्षक श्री.संतोष शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार श्री.ईकबाल शेख, पोलीस हवालदार श्री.योगेश कुंभार, पोलीस हवालदार श्री.सुरेश भापकर, पोलीस नाईक श्री.पृथ्वीराज पांडुळे, पोलीस नाईक श्री.कौस्तुभ जाधव, पोलीस नाईक श्री.गणेश आगम, पोलीस शिपाई श्री.अजीम शेख, पोलीस शिपाई श्री.मोहन मिसाळ यांच्या पथकाने कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व लॉकडावुन काळात कर्नाटक राज्यामधील बलरगी गाव, ता.अफजलपुर, जि.गुलबर्गा या ठिकाणी जावुन तेथील स्थानिक पोलीसांच्या मदतीने दाखल गुन्हयांतील आरोपी काशिनाथ चंद्रकांत गायकवाड (वय.२८ रा.बुध्द मंदीरा जवळ,किरकटवाडी.पुणे, मूळगाव रा. बलरगी,ता.अफजलपुर जि.गुलबर्गा, राज्य-कर्नाटक) याला सापळा रचून अटक करत दाखल गुन्हयांतील ३३ तोळे वजनाचे दागिने जप्त करुन घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कामगिरी..
श्री.सुनिल फलारी मा.अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर यांच्या सुचनांप्रमाणे मा.पोलीस उपआयुक्त परिमंडळ-पुणे शहर श्री.सुहास बावचे, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री.सुनिल कलगुटकर, कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड, कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेप्रमाणे गुन्हे प्रगटीकरण शाखाचे मा.पोलीस उपनिरीक्षक श्री.संतोष शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार श्री.ईकबाल शेख, पोलीस हवालदार श्री.योगेश कुंभार, पोलीस हवालदार श्री.सुरेश भापकर, पोलीस नाईक श्री.पृथ्वीराज पांडुळे, पोलीस नाईक श्री.कौस्तुभ जाधव, पोलीस नाईक श्री.गणेश आगम, पोलीस शिपाईं श्री.अजीम शेख, पोलीस शिपाईं श्री.मोहन मिसाळ यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages