👌पुण्यात "कोरोना"च्या पार्श्वभूमीवर "आनंद दरबारात" गोरगरिबांसाठी मदतयज्ञ अखंडपणे सूरु.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, April 13, 2020

👌पुण्यात "कोरोना"च्या पार्श्वभूमीवर "आनंद दरबारात" गोरगरिबांसाठी मदतयज्ञ अखंडपणे सूरु..


👌 पुण्यात "कोरोना"च्या पार्श्वभूमीवर "आनंद दरबारात" गोरगरिबांसाठी मदतयज्ञ अखंडपणे सूरु..
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. यामुळे हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांच्या मदतीसाठी आनंद दरबार, आनंदरत्न जैन स्थानक, दत्तनगर, पुणे येथे अन्नछत्र सुरु केले आहे. समाजसेवक श्री.बाळासाहेब धोका यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या या अन्नदानाच्या महायज्ञात दररोज ६५० नागरिकांना जेवणाची पाकिटे दिले जात असून धान्यांचीही मदत केली जात आहे. या मदत यज्ञाचा गाजावाजा किंवा प्रसिद्धी न करता मदतयज्ञ अखंडपणे सूरु आहे.
कोरोना व्हायरसचा धोका वाढल्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊन जाहिर केला. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब कुटुंबावर संकट कोसळले. रोजगार बुडाला, हाताला काम नाही, घराबाहेर पडायचे नाही, अशा परिस्थितीत पोट कसे भरणार असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा गोरगरीबांच्या मदतीसाठी समाजसेवक श्री.बाळासाहेब धोका यांनी लॉकडाऊनच्या काळात एकही नागरिक उपाशी झोपणार नाही यासाठी 23 मार्चपासून आनंद दरबार, आनंदरत्न जैन स्थानक, दत्तनगर, पुणे येथे मदत केंद्र सुरु केले. आनंदरत्न जैन स्थानकच्या कार्यकर्त्याच्या मदतीने व व्यापारी संघ दत्तनगर अध्यक्ष श्री.संदीप बेलदरे, उपअध्यक्ष श्री.अमोल बागमार यांच्या सहकार्याने शहराच्या कानाकोपऱ्यातील बेघर, मजूर, गरजूंना अन्नाच्या पाकिटाचे वाटप करत आहेत.

अन्नधान्यांचेही वाटप..
अन्नांच्या पाकीटाबरोबरच धान्यांचे पाकिट दिले जात आहे. एका पाकिटात ५ किलो गहू, तीन किलो तांदूळ, तिखट, मसाला, मीठ पुडा, अर्धा लिटर तेल, डेटॉल साबण असे साहित्याचे पाकिट तयार केले जाते. हे पाकिट व जेवणाची पाकिटे दत्तनगर, कात्रज ,अंजली नगर, शनी नगर, हनुमान नगर, सच्चाई नगर , कोंढवा, आंबेगाव पठार या भागातील भागातील ४ हजार गरजू कुटुंबानां वाटप केले आहे. आतापर्यत ३ क्विंटल गहू, १ क्विंटल तांदूळ वाटप केले. मदतीचा सदैव हात देण्याचे काम सूरू असल्याचे पहायला मिळत आहे.

व्यापारी संघाची मदत..
समाजसेवक श्री.बाळासाहेब धोका यांनी सूरु केलेल्या मदत यज्ञाला वीस दिवस पूर्ण झाले. या मदतयज्ञाला दानशुर व्यक्तींची मदत होत आहे. त्याचबरोबर व्यापारी संघ दत्तनगर अध्यक्ष श्री. संदीप बेलदरे, उपअध्यक्ष श्री.अमोल बागमार यांच्याकडून धान्याची मदत मिळत आहे. आजपर्यत ४ हजार पाकिटे, पाण्याच्या बाटल्या, मास्कचे वाटप करण्यात आले आहे.

सकाळी 11 वाजता वाटपाला सूरुवात..
दररोज सकाळी सात वाजता स्वयंपाकाला सूरूवात होते. पोळी, भाजी आणि खिचडीचे पाकिट तयार करुन आनंदरत्न जैन स्थानकाचे कार्यकर्ते हॅण्डग्लोज, मास्क लावून, सॅनिटायझरचा वापर करून कार्यकर्ते संपूर्ण शहरातील कानाकोपऱ्यायात आलेल्या गरजवंतानामध्ये सुरक्षित सामाजिक अंतर ठेवून अन्नाच्या पाकिटाचे वाटप करत आहेत. सायंकाळी अन्नाची पाकिटाचे वाटप झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाचे नियोजन करण्यात येते. अन्नदानाच्या महायज्ञासाठी लागणारे भाजी-पाला शेतकऱ्यांकडून खरेदी करीत आहे. लॉकडाऊनमूळे शेतमाल विक्रीसाठी आणता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांकडून भाजी-पाला खरेदी करुन त्यांनाही मदत होते व आपलीही गरज भागवली जात असल्याचे समाजसेवक श्री.बाळासाहेब धोका यांनी सांगितले.

Post Bottom Ad

#

Pages