👌लॉकडाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावणार्या कर्मचार्याचे कौतुकाचे गाणे व्हायरल.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, April 14, 2020

👌लॉकडाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावणार्या कर्मचार्याचे कौतुकाचे गाणे व्हायरल..


👌 लॉकडाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावणार्या कर्मचार्याचे कौतुकाचे गाणे व्हायरल..

देशात लॉकडाऊन सुरू असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मात्र अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत असताना एक नागरिक म्हणून त्यांचे आभार व्यक्त करायलाही कोणी विसरत नाही. यामध्ये आता मराठी कलाकारही उतरले असून त्यांनी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या पोलीसदल, डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्यसेवक, सफाई कामगार, सरकारी कर्मचारी, सेवाभावी संस्था, पत्रकार, सुरक्षा रक्षक, शेतकरी, भाजी विक्रेते यांना धन्यवाद देणारे एक गाणं शूट केले आहे. मराठीतील तब्बल ३२ कलाकारांनी या गाण्यात सहभाग घेतला असून सध्या हे गाणं सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे.

असे आहे व्हायरल गाणं..
तू आहेस म्हणुन आम्ही घरी सुरक्षित आहोत
तू आहेस म्हणुन हा देश लढतोय
तू आहेस म्हणुन माणुसपण जगतं
माणसातल्या देवा, तुला आमचा मानाचा मुजरा
तू चाल पुढं
तुझं हे योगदान आम्ही कधीच विसरणार नाही


Post Bottom Ad

#

Pages