🚨धक्कादायक.. वांद्रे गर्दी प्रकरणी "एबीपी माझा" वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर गुन्हा दाखल.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, April 15, 2020

🚨धक्कादायक.. वांद्रे गर्दी प्रकरणी "एबीपी माझा" वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर गुन्हा दाखल..


🚨 धक्कादायक.. वांद्रे गर्दी प्रकरणी "एबीपी माझा" वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर गुन्हा दाखल..
एबीपी माझा या वृत्तवाहिनीचा धाराशिवचा प्रतिनिधी राहुल कुलकर्णी याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कुलकर्णी याची एक बातमी एबीपी माझा वृत्तवाहिनीवर एक बातमी चालवण्यात आली होती. अडकलेल्या मजुरांना गावी नेण्यासाठी ट्रेन सुरू केल्या जाणार असल्याचं या बातमीमध्ये म्हटलं होतं. या बातमीमुळे गावी परतण्यासाठी मंगळवारी वांद्रे येथे मुंबईत राहणाऱ्या इतर राज्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सध्या संपूर्ण देशात जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. असं असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने कोरोनाचा संसर्ग धोका वाढण्याची दाट शक्यता असते. यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर बनले असून, पोलिसांनी या प्रकरणी जवळपास 800 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

FIR against TV journalist over his report that trains would restart, which may have prompted migrants’ gathering at Bandra: Police

— Press Trust of India (@PTI_News) April 15, 2020

राहुल कुलकर्णी याला या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ताब्यात घेण्यात आले असून त्याला बुधवारी मुंबईला आणण्याची शक्यता आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी घडलेल्या घटनेबाबत एक ट्विट करताना एबीपी वृत्तवाहिनीने दाखवलेल्या बातमीचा व्हिडीओ शेअर केला होता. या बातमीनंतर वांद्रेमध्ये गर्दी जमल्याची शक्यता नाकारता येत नाही असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

आज दोपहर @abpmajhatv की इस खबर के बाद शायद बान्द्रा में भीड़ जुटी हो इस से इनकार नही किया जा सकता।#लॉकडॉउन pic.twitter.com/6El5SH1jxE

— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 23 मार्चला जाहीर केलेला लॉकडाऊन आज संपणार, गाडय़ा सुरू होणार आणि आपल्याला मूळ गावी जाता येणार. अशा आशेवर असलेल्या हजारो परप्रांतीय मजुरांचा मंगळवारी भ्रमनिरास झाला. लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवले गेले. ती बातमी ऐकताच या मजूरांनी वांद्रे स्थानकाच्या बाहेर येत रस्त्यावर गर्दी केली. या अचानक झालेल्या गर्दीमुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली. या जमावाला भडकावून गर्दी जमवल्याप्रकरणी पोलिसांनी विनय दुबे नावाच्या एका व्यक्तीलाही ताब्यात घेतलं आहे.

कोरोनामुळे हजारो परप्रांतीय मजूरांचे काम बंद झाले. रेल्वेगाडय़ाही बंद झाल्याने त्यांना मूळ गावीही परतणे कठीण झाले. 23 मार्चपासून आतापर्यंत ते लॉकडाऊन उठण्याची आतुरतेने वाट पाहत होते. आज लॉकडाऊन उठले तर गाडी पकडून थेट गाव गाठण्याचा सर्वांचा इरादा होता. वांद्रे स्थानकातून उत्तर प्रदेश, बिहारसाठी विशेष गाडय़ा सोडल्या जाणार असल्याची माहिती त्यांना कुणीतरी दिली होती. त्यासाठी हजारो मजूर वांद्रे स्थानकात जमले होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढल्याची घोषणा केल्याने रेल्वेनेही तोपर्यंत गाडय़ा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता आपण मुंबईतच अडकलो या भीतीने हे मजूर वांद्रे स्थानकाबाहेर पडले आणि तिथे त्यांचा जमाव पाहून काहींनी सोशल मीडियावर ती दृष्ये व्हायरल करून अफवा पसरवण्याची संधी साधली.

Post Bottom Ad

#

Pages