📲 नासाने भारताचा त्या ९ मिनिटात सॅटेलाईटतून काढलेल्या व्हायरल फोटोचे जाणून घ्या सत्य.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, April 6, 2020

📲 नासाने भारताचा त्या ९ मिनिटात सॅटेलाईटतून काढलेल्या व्हायरल फोटोचे जाणून घ्या सत्य..


📲 नासाने भारताचा त्या ९ मिनिटात सॅटेलाईटतून काढलेल्या व्हायरल फोटोचे जाणून घ्या सत्य..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर काल, ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी देशभरात लोकांनी दिवे बंद केले. पणत्या, मोबाईल फ्लॅश, मेणबत्त्या पेटवल्या. या सर्व गोष्टींचे फोटो आणि व्हिडिओ लोकांनी सोशल मीडियावर शेअरदेखील केले. त्यामध्ये नासाने भारताचा त्या ९ मिनिटाच्या कालावधीत अंतराळातून सॅटेलाईटच्या माध्यमातून काढलेला फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. या फोटोत संपूर्ण देश दिव्याच्या झगमगीत उजळून निघालेला पाहायला मिळतो. मात्र हा फोटो खरच नासाचा आहे का, यावर तर्क वितर्क सुरू झाले.

हा व्हायरल फोटो अनेकांच्या त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला. इतकंच नव्हे तर बिग बी अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या ट्विटर हँडलवर हा सुंदर फोटो शेअर केला. मात्र यामागे काय तथ्य आहे जाणून घेऊया.

काय आहे तथ्य..
नासाने भारताचा असा कोणताही फोटो अंतराळातून टिपलेला नाही. २०१७ साली नासा असे काही फोटो प्रसिद्ध केले होते. ज्यामध्ये आपला ग्रह पृथ्वी रात्रीच्या काळोखात कसा दिसतो हे लोकांना पाहता येईल. यापूर्वीही २०१२ साली अशीच काही छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली होती. या फोटोंना नाईट लाइट्स असे म्हटले जाते.

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार,
हा व्हायरल फोटो सॅटेलाईटवरून भारतातील घेतलेल्या काही फोटोंचा मिळून बनवण्यात आला आहे. हा फोटो नॅशनल ऑसिनिक अँड अॅटमोस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनने २००३ साली बनवला होता. या फोटोद्वारे देशातील वाढती लोकसंख्या दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. फोटोतील पांढरी लाईट ही १९९२ सालच्या पूर्वीही दिसत होती. तर निळी, हिरवी आणि लाल लाईट असे विभाग आहेत जिथे १९९२, १९९८ आणि २००३ मध्ये दिसू लागले.

Post Bottom Ad

#

Pages