🙏कोरोनाविरुद्ध "रक्षणकर्त्य पुणे पोलिसांची" व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांसह देवालाही आर्त हाक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, April 7, 2020

🙏कोरोनाविरुद्ध "रक्षणकर्त्य पुणे पोलिसांची" व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांसह देवालाही आर्त हाक..

🙏कोरोनाविरुद्ध "रक्षणकर्त्य पुणे पोलिसांची" व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांसह देवालाही आर्त हाक..

देशभरासह मुंबई पुण्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. देशभरात दहशत माजवणाऱ्या या कोरोना व्हायरसविरूद्ध लढा देत असताना प्रशासनाने देखील आपली जिद्द कायम ठेवली आहे. प्रशासनासह जनतेची सेवा करणारे खाकी वर्दीतले खरे लढवय्ये हे रात्रंदिवस मेहनत घेत आहे. कोरोना व्हायरसपासून नागरिकांनी आपले संरक्षण करावे यासाठी प्रशासनाकडून नागरिकांनी वेळोवेळी आवाहन केले जात आहे. हे आवाहन करताना घरात सुरक्षित रहा, वारंवार हात धुवा, मास्क लावा असे आवर्जून सांगितले जात आहे.

कोरोना व्हायरसपासून दूर राहण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचा सल्ला दिला जात असताना यामध्ये पुणे पोलीस देखील मागे राहिले नाही तर पुणे पोलिसांनीही कंबर कसली आहे. हे आवाहन करताना त्यांनी नागरिकांना एका व्हिडीओच्या माध्यमातून भावनिक आवाहन करत नागरिकांसह देवाला देखील आर्त हाक दिली आहे.

अशी दिली संरक्षणकर्त्यांने आर्त हाक..
‘वाट दिसू दे गा देवा’ या गाण्यावर पुणे पोलिसांनी पाटीवर लिहिलेले संदेश सर्वांपर्यंत पोहोचवले आहेत. ‘हात धुवा पुन्हा पुन्हा, घरात आहे बाळ तान्हा’; ‘तुम्ही सुरक्षित तर, कुटुंब सुरक्षित’; ‘कृपया नियम पाळा ! माझ्यासाठी, आपल्या देशासाठी !’ आणि ‘आम्हा ना मिळे वर्क फ्रॉम होम, रक्षितो तुमचे होम स्वीट होम’,श्रीमंत गरीब राजा नि रंक सगळ्यांना सारखा, कोरोनाचा डंख असे संदेश या रक्षणकर्त्यांनी दिले आहेत.

जनतेच्या संरक्षणासाठी झटणारे, वेळेप्रसंगी आपल्या कुंटुबापासून दूर राहत जनतेचं हित आपलेसे करणाऱ्या या संरक्षणकर्त्याला सहकार्य करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यामुळे घरात सुरक्षित राहून आपण त्यांना नक्की सहकार्य करूया.


Post Bottom Ad

#

Pages