👌पिसोळी गावचे सरपंच श्री.मच्छिंद्र दगडे यांचे कार्य आदर्शवत ३०० गरजवंताना मदतीचा हात.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, April 20, 2020

👌पिसोळी गावचे सरपंच श्री.मच्छिंद्र दगडे यांचे कार्य आदर्शवत ३०० गरजवंताना मदतीचा हात..


👌 पिसोळी गावचे सरपंच श्री.मच्छिंद्र दगडे यांचे कार्य आदर्शवत ३०० गरजवंताना मदतीचा हात..
रविवार दि.१९/४/२०२० रोजी पिसोळी गावचे सरपंच श्री.मच्छिंद्र दगडे यांनी सामजिक बांधिलकी जोपासत कोरोना संचारबंदीत मोलमजुरी करणाऱ्या गरजू व गरीब कुटुंबीयांच्या मदतीसाठी पुढाकार घेत स्वखर्चाने ३०० गोरगरीब व गरजू कुटुंबाना धान्य वाटप केले.
देशात व राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून शासनाने संचारबंदी व लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवले आहे. ग्रामीण भागातील मजुरी करून पोट भरणाऱ्या कुटुंबीयावर त्याचा परिणाम होत आहे. दिवसेंदिवस संचारबंदी अधिक कडक करण्यात येत आहे. ग्रामस्थांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात आले असून रोजगाराचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. शासकीय सेवेतून उपलब्ध सोयीसुविधा या मजूर ग्रामस्थांना मिळवून देण्यासाठी समस्त दगडे परिवार, मा.उपसरपंच श्री.गणपत मामा दगडे, ग्रा.प.सदस्या प्रज्ञाताई दगडे, श्री.मनोज पटेल, श्री.रोहन राठी, श्री.वेंकटेश जालगी (परमसाई ), श्री.सय्यद भाई, श्री.लहू दगडे, श्री.मिलिंद मासाळ, श्री.गणेश दगडे, श्री.नवनाथ धावडे, श्री.राजेंद्र धावडे, श्री.सचिन धावडे, ग्रामस्थ यांनी पिसोळी गावचे सरपंच श्री.मच्छिंद्र दगडे यांच्या पुढाकारात ३०० गोरगरीब गरजू कुटुंबाना मानसिक आधाराबरोबर महिनाभर पुरेल इतके तांदूळ, कांदे, बेसन पीठ, मोहरी, साबण, खजूर व बिस्किट पुडे इ. स्वरूपात प्रशासनाने दिलेल्या अटीचे पालन करत सामाजिक अंतर राखून किराणा वस्तूचे वाटप करण्यात आले आहे.

पिसोळी गावचे सरपंच श्री.मच्छिंद्र दगडे यांनी दगडे वस्ती, पिसोळी येथे जाऊन गावातील कुटुंबाशी प्रत्यक्ष संपर्क करून अल्प भूधारक शेतकऱ्यांना पंतप्रधान सहाय्यता निधी मिळाला का? जनधन योजनेचे पैसे मिळाले का? रेशन दुकानातून धान्य मिळाले का? अजारी रुग्णावर उपचार केले जातात का ? गावासाठी नेमलेले शासकीय कर्मचारी गावात येतात का? काही अडचण आहे का याची माहिती घेत आपुलकीने चौकशी करून नागरिकांना मानसिक धीर देण्याचे मौलाचे काम करत आहेत. सरपंच श्री.मच्छिंद्र दगडे यांनी केलेल्या सामाजिक उपक्रमाचे अन्य गावांतून कौतुक होत आहे.

Post Bottom Ad

#

Pages