😱 मुंबई-पुणे येथे लॉकडाऊनचा उडालेला फज्जा; पुणे आणि मुंबई हे दोन्ही जिल्हे सध्या कोरोनाचे झाले हॉटस्पॉट.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, April 21, 2020

😱 मुंबई-पुणे येथे लॉकडाऊनचा उडालेला फज्जा; पुणे आणि मुंबई हे दोन्ही जिल्हे सध्या कोरोनाचे झाले हॉटस्पॉट..


😱 मुंबई-पुणे येथे लॉकडाऊनचा उडालेला फज्जा; पुणे आणि मुंबई हे दोन्ही जिल्हे सध्या कोरोनाचे झाले हॉटस्पॉट..
देशभरात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. तर महाराष्ट्रात देखील सर्वाधिक रुग्ण हे मुंबई आणि त्याखालोखाल पुण्यामध्ये सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन्ही ठिकाणी लॉकडाऊनच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आले आहे. पुण्यामध्ये तर रविवारी मध्यरात्रीपासून २७ एप्रिलपर्यं पूर्ण शहरच लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेले पुणे आणि मुंबई हे दोन्ही जिल्हे सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहेत. थेट केंद्रीय गृहविभागाने याबाबत चिंता व्यक्त केली असून आता दोन केंद्रीय पथकं मुंबई आणि पुण्याला प्रत्यक्ष भेट देऊन इथल्या परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचं पत्रक केंद्र सरकारने काढलं आहे.
मुंबई-पुणे कोरोनाच्या टार्गेटवर..
मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असून आकडा २ हजारांच्या वर गेला आहे. तर पुण्यात देखील जवळपास ६०० कोरोनाग्रस्त रुग्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन्ही जिल्ह्यांमधली परिस्थिती गंभीर झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळ केंद्रीय गृह विभागाने प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचं परिपत्रक काढलं आहे. ‘देशभरात अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनच्या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होताना पाहायला मिळत आहे. अशा सर्व जिल्ह्यांमधल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुंबई आणि पुण्यातली परिस्थिती गंभीर असल्याचं निदर्शनास आलं आहे’, असं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

MHA writes to Maharashtra over violations to COVID19 lockdown measures; Situation especially serious in Mumbai & Pune (Maharashtra). Inter-Ministerial Central Teams (IMCT) to visit Mumbai & Pune to make on-spot assessment of situation, issue necessary directions to the State pic.twitter.com/r00037yd9v

केंद्र सरकारला अहवाल सादर होणार..
दरम्यान, मुंबई आणि पुण्यातल्या परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृह विभागाने दोन पथकांची नियुक्ती केली आहे. ‘मुंबई आणि पुण्यात प्रत्यक्ष जाऊन तिथल्या परिस्थितीचा व्यापक आढावा घेण्यासाठी २ पथकांची नियुक्ती करण्यात येत आहे. हे गट मुंबई आणि पुणे जिल्ह्याला भेट देऊन तिथल्या परिस्थितीसंदर्भात राज्य सरकारला निर्देश देतील. शिवाय, याबाबत तिथल्या परिस्थितीचा अहवाल केंद्र सरकारला सादर करतील’, असं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

Post Bottom Ad

#

Pages