👰लग्नाचे मुहूर्त हुकलेल्यासाठी आता गुड न्यूज; यंदा चातुर्मासातदेखील लग्नाचे मुहूर्त.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, April 22, 2020

👰लग्नाचे मुहूर्त हुकलेल्यासाठी आता गुड न्यूज; यंदा चातुर्मासातदेखील लग्नाचे मुहूर्त..


👰 लग्नाचे मुहूर्त हुकलेल्यासाठी आता गुड न्यूज; यंदा चातुर्मासातदेखील लग्नाचे मुहूर्त..

कोरोनामुळे यंदा कर्तव्य आहे असं म्हणणाऱ्या अनेक जोडप्यांचा हिरमोड झाला. अनेकांनी आपल्या ठरलेल्या शुभमुहूर्तावरील लग्न कोरोनामुळे पुढे ढकलले आहे. त्यामुळे बोहल्यावर चढणाऱ्यांची संधी कोरोनाने हुकली. पण अशा मुहूर्त हुकलेल्या अनेकांसाठी आता गुड न्यूज आहे. यंदा चातुर्मासातदेखील लग्नाचे मुहूर्त नक्की करण्यात आले आहेत. पंचांगकर्त्यांनीदेखील या गोष्टीला दुजोरा दिला आहे. त्यामुळे कधीही लग्न न होणाऱ्या चातुर्मासातदेखील यंदा सनई चौघडे वाजणार आहेत.

कोणत्या महिन्यात किती मुहूर्त..
यावर्षी, १ जुलै ते २६ नोव्हेंबर २०२० पर्यंत चातुर्मास आहे.
जुलै १२ दिवस
ऑगस्ट १३ दिवस
ऑक्टोबर ८ दिवस
नोव्हेंबर ८ दिवस
डिसेंबर ६ दिवस

१८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर अधिक आश्विन महिना असल्यामुळे विवाह मुहूर्त नाहीत.
हिंदुस्थानासह देशभरात वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. त्यामुळे यंदा कर्तव्य असलेल्या अनेकांना आपले शुभ लग्न पुढे ढकलत सावधनाता बाळगावी लागली. त्यामुळे अनेकांच्या आनंदावर विरजण पडले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव संपण्याचे काही नाव घेत नाही. त्यातच जुलै महिन्यांपासून चतुर्मास सुरु होत आहे. त्यामुळे अनेकांना लग्नासाठी पुढच्या वर्षीचा शुभमूहूर्त निश्चित करण्याची वेळ आल्याने लग्नाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अनेकांसमोर आता पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला होता. पण आता त्याची चिंता करण्याची गरज नाही. यंदाच्या वर्षी चतुर्मासातही विवाह मूहूर्त निश्चित करण्यात आले असून चतुर्मासात लग्न करणे आता शुभ मानले जाणार आहे. पंचांगकत्र्यांनीदेखील या शुभ मुहूर्ताला दुजोरा दिला आहे. सर्व पंचांगकत्र्यांनी मुहूर्तसिंधू या ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे चतुर्मासातही विवाह मुहूर्त निश्चित केले आहेत.

याबद्दल ज्येष्ठ पंचागकर्ते आणि खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी स्पष्ट केले की, आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चतुर्मास असतो. या महिन्यात पाऊस भरपूर पडत असल्याने पूर्वी प्रवासाची साधने नसल्याने आणि शेतीची कामे असल्याने विवाह करण्याची प्रथा नव्हती. त्यावेळी लोकसंख्याही कमी होती. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे पंचांगात पुढीलप्रमाणे विवाहमुहूर्त देण्यात आले आहेत. कोरोनामुळे लोकांना विवाह स्थगित करावे लागले तरी चिंता करण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad

#

Pages