😱 पुण्यात पोलिस निरीक्षकांच्या गाडीचा भीषण अपघात.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, April 24, 2020

😱 पुण्यात पोलिस निरीक्षकांच्या गाडीचा भीषण अपघात..😱 पुण्यात पोलिस निरीक्षकांच्या गाडीचा भीषण अपघात..

पुणे पोलिस दलातील एका पोलीस निरीक्षकांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी घडली. शिवाजीनगर कृषी महाविद्यालया समोरील ब्रिजवर हा अपघात झाला आहे. यात गाडी चालक आणि पोलीस निरीक्षक हे जखमी झाले असून दोघांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विश्रामबाग पोलीस ठाणेमध्ये पोलीस निरीक्षक (गुन्हे) राम राजमाने असे अपघातात जखमी झालेल्याचे नाव आहे. तर त्यांचे जखमी गाडी चालकाचे नाव समजू शकले नाही.

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार,
पुणे शहर परिमंडळ १ मधील विश्रामबाग पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) राम राजमाने हे आज शुक्रवार दि.२४ एप्रिल सकाळी रोजी घरून विश्रामबाग पोलीस ठाणेमध्ये येत असतांना रस्त्यात कृषी महाविद्यालय समोरील ब्रिजवर गाडी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी डिव्हायडरला धडकल्याने डिव्हायडर आणि गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात पोलीस निरीक्षक आणि गाडी चालक यात गंभीर जखमी झाले असून त्या दोघांना तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आहे.

Post Bottom Ad

#

Pages