😷 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने ५०० फेस प्रोटेक्टर शील्ड पुणे पोलीसांना केले सुपूर्त.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, April 20, 2020

😷 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने ५०० फेस प्रोटेक्टर शील्ड पुणे पोलीसांना केले सुपूर्त..


😷 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने ५०० फेस प्रोटेक्टर शील्ड पुणे पोलीसांना केले सुपूर्त..

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या संयोजनाने सोमवार दि.२० रोजी स्वारगेट पोलीस ठाणेमध्ये शंत्रुजय टेम्पल ट्रस्टचे अध्यक्ष उद्योगपती श्री. संजय शहा यांच्या सहकार्यातून ५०० फेस प्रोटेक्टर शील्ड मा.सहाय्यक पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) पुणे श्री. शिवाजीराव पवार, मा.सहाय्यक पोलीस उपायुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर श्री. सर्जेराव बाबर, स्वारगेट पोलीस ठाणेचे मा.वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. ब्रम्हानंद नाईकवाडी यांना पोलिसांच्या स्वसंरक्षणसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष श्री. किरण जोशी यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले.

पुणे पोलीसांना ५०० फेस प्रोटेक्टर शील्ड वाटपाच्या कार्यक्रमाचे संयोजन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे शहर अध्यक्ष श्री. नितीन बिबवे, पुणे जिल्हा सरचिटणी श्री. अभिजित डुंगरवाल, पुणे शहर कार्याध्यक्ष श्री. अजित घस्ते, पुणे शहर खजिनदार श्री. पंकज बिबवे, पुणे शहर संघटक सचिव श्री. भूषण गरुड
यांनी केले आहे.

फेस प्रोटेक्टर शील्डचे वैशिष्टे..
कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव पाहता देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. आपत्कालीन आणि आवश्यक कामांव्यतिरिक्त, लोकांचे बाहेर पडणे पूर्णपणे बंद आहे. अगदी भारतातील बर्‍याच राज्यांत घराबाहेर असताना मास्क घालणे अनिवार्य केले गेले आहे. कारण कोरोना विषाणू हा निसर्गातील एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे जो थेंबांच्या माध्यमातून 6 फुटांपर्यंत पसरतो. यामुळेच डॉक्टरांनी केवळ वैद्यकीय कर्मचार्‍यांनाच नाही तर सर्वसामान्यांनाही फेस प्रोटेक्टर शील्ड घालणे हा संसर्गापासून दूर राहण्याचा एक चांगला मार्ग आहे. कारण यामुळे नाक, तोंड आणि डोळे व्यवस्थित झाकले जातात. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी फेस प्रोटेक्टर शील्ड घालण्याची शिफारस केली जात आहे. टोकियोच्या महामारी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, फेस प्रोटेक्टर शील्ड मास्कपेक्षा संरक्षण करण्यास अधिक सक्षम आहे. कारण फेस प्रोटेक्टर शील्ड चेहरा अधिक ब्लॉक करते आणि चेहऱ्याला वारंवार हात लावण्यापासून प्रतिबंधित करते.
फेस प्रोटेक्टर शील्डची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती जास्त काळ टिकते आणि बर्‍याच वेळा सहज साफ केली जाऊ शकते. बरेच लोक असा विश्वास करतात की मास्क घालण्याने गुदमरल्यासारखे वाटते, तर फेस प्रोटेक्टर शील्डने असे होत नाही.

Post Bottom Ad

#

Pages