😱 केंद्रीय कर्मचार्‍यांना देण्यात येणारा महागाई भत्ता (डीए) बंद.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, April 23, 2020

😱 केंद्रीय कर्मचार्‍यांना देण्यात येणारा महागाई भत्ता (डीए) बंद..


😱 केंद्रीय कर्मचार्‍यांना देण्यात येणाराप्र महागाई भत्ता (डीए) बंद..
जगभरात कोरोना प्रसार झालेला आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाच्या या संकटामुळे देशातील अर्थकारणावरही मोठा परिणाम झालेला आहे.यादरम्यानच,गुरुवारी भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. निकालानुसार केंद्रीय कर्मचार्‍यांना देण्यात येणाऱ्या डीए म्हणजेच महागाई भत्ता यावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी १ जुलै २०२१ पर्यंत लागू राहील.

वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार कोरोना विषाणूच्या संकटामुळे डीएची रक्कम १ जानेवारी,२०२० नंतर केंद्रीय कर्मचारी किंवा पेन्शनर्सना दिली जाणार नाही. त्याच वेळी,१ जुलै २०२० पासून प्राप्त होणारा अतिरिक्त डीएही देण्यात येणार नाही आता डीए देण्याचा निर्णय पुन्हा केव्हा घेतला जाईल,हे १ जुलै २०२१ रोजी हे स्पष्ट होईल.हा आदेश पेन्शन मिळविणार्‍या केंद्रीय कर्मचारी आणि केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांनाही लागू असेल.

विशेष म्हणजे कोरोना संकटामुळे केंद्र सरकारकडून अनेक प्रकारच्या योजनांमध्ये कपात केली जात आहे.यापूर्वी गुरुवारी संरक्षण अर्थसंकल्पात कपात होण्याची चर्चा सुरू झाली असून तेथे नवीन साहित्यांची खरेदी काही काळ थांबविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणेच्या रॅफेल विमानांच्या खरेदीवरही या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो.

तत्पूर्वी, भारत सरकारने पंतप्रधान, राष्ट्रपती, खासदार, मंत्र्यांच्या पगारामध्ये ३०% पर्यंत कपात करण्याची घोषणा केली होती. एवढेच नव्हे तर खासदार निधीसुद्धा दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आलेला आहे.कोरोना विषाणूच्या या संकटामुळे, देशात ४० दिवसांचा लॉकडाउन लागू आहे. ज्यामुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे,सध्या सर्व काही बंद आहे. त्याचा थेट परिणाम जीडीपी आणि महसुलावरही दिसून येतो आहे.

Post Bottom Ad

#

Pages