😱 पुण्यात "कोरोना"च्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीतील मुख्य बाजारासह खडकी, मोशी, उत्तमनगर उपबाजार आजपासून बंद.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, April 10, 2020

😱 पुण्यात "कोरोना"च्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीतील मुख्य बाजारासह खडकी, मोशी, उत्तमनगर उपबाजार आजपासून बंद..


😱 पुण्या "कोरोना" च्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीतील मुख्य बाजारासह खडकी, मोशी, उत्तमनगर उपबाजार आजपासून बंद..

पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या पार्श्वभूमीवर पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील मुख्य बाजारासह खडकी, मोशी, उत्तमनगर उपबाजार आजपासून बंद राहणार आहेत. या सर्व बाजारांमधील फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विक्री आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त श्री.डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

शुक्रवार दि.10 एप्रिल 2020 रोजी पुण्यात एपीएमसीमध्ये सर्व उपबाजारपेठ कार्यरत आहे परंतु पोलिस संरक्षणाच्या अभावामुळे सामाजिक अंतर राखणे अवघड होत असल्याने मुख्य बाजार परिसर जवळ असलेल्या पुणे महानगरपालिकेने कोरोना बाधित क्षेत्र सीलबंद केल्यामुळे मुख्य बाजार बंद करण्यात आला आहे तसेच मांजरी उपबाजारपेठ अनियंत्रित गर्दीमुळे बंद आहे.
मोशी उपबाजारपेठेत - 275 वाहनांतून प्रमाण 4000 क्विंटल आवक.
खडकी उपबाजारपेठेत - 20 वाहनांतून प्रमाण 300 क्विंटल आवक.
उत्तमनगर उपबाजारपेठेत - 6 वाहनांतून प्रमाण 100 क्विंटल आवक झाली आहे असे तिन उपबाजारपेठेत 301 वाहनांमधून 4 हजार 400 क्विंटल मालाची किरकोळ प्रमाणात आवक झाली आहे.

श्री.डॉ. म्हैसेकर म्हणाले,
पुण्यातील या सर्व मार्केटमधील विविध विभाग पुढील काळात बंद राहणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने फळं, भाजीपाला, कांदा-बटाटा याची विक्री पूर्णपणे बंद राहणार आहे. मात्र, भुसार आणि कडधान्य विभाग सुरु राहणार आहेत.

पुणे शहरात १५ नवे कोरोनाबाधित..
पुणे शहरात आणखी १५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील ११ जण डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात तर ४ जण ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामुळे पुणे शहरातील रुग्णांची संख्या आता १९० झाली असून जिल्ह्यातील संख्या २२५ झाली आहे. तसेच २० करोनाबाधित रुग्णांचा आजवर मृत्यू झाला आहे, अशी माहिती महापौर श्री. मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

Post Bottom Ad

#

Pages