😱संचारबंदीत रस्त्यावर फिरणाऱ्यांना हटकले असता कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, April 28, 2020

😱संचारबंदीत रस्त्यावर फिरणाऱ्यांना हटकले असता कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला..


😱 संचारबंदीत रस्त्यावर फिरणाऱ्यांना हटकले असता कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला..

विनाकारण रस्त्यावर फिरत असताना हटकले असता तिघांनी मिळून एका पोलिसावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना सोमवारी (ता. 27) काळेवाडीतील भारतमाता चौकात घडली.
असा घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांवर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे.

युनूस गुलाब अत्तार (वय 50), मतीन युनूस अत्तार (वय 28), मोईन युनूस अत्तार (वय 24, सर्व रा. श्रीकृष्ण कॉलनी, भारतमाता चौक, काळेवाडी, पिंपरी) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींपैकी मतीन हा पोलिस दलात कार्यरत आहे. या घटनेत शंकर विश्वभर कळकुटे असे प्राणघातक हल्ला झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या सर्वत्र संचारबंदी लागू आहे. विनाकारण रस्त्यावर फिरण्यास मनाई आहे. तरीही सोमवारी सायंकाळी ०५.३० वाजण्याच्या सुमारास युनूस अत्तार विनाकारण रस्त्यावर फिरत असताना फिर्यादीने त्याला हटकले. यावरून युनुसने फिर्यादीशी वाद घातला. त्यावेळी युनुसची दोन्ही मुले मतीन व मोईन तेथे आले. मतीनने फिर्यादीला काठीने तर युनूस व मोईनने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत फिर्यादीच्या हातातील काठी हिसकावून घेत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
सदर घटनेचा पुढील तपास वाकड पोलिस करीत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages