👌"कोरोना"च्या पार्श्वभूमीवर देशातील पहिली सॅनिटायझेशन व्हॅन पुणे पोलिसांच्या सेवेत दाखल.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, April 6, 2020

👌"कोरोना"च्या पार्श्वभूमीवर देशातील पहिली सॅनिटायझेशन व्हॅन पुणे पोलिसांच्या सेवेत दाखल..

👌"कोरोना"च्या पार्श्वभूमीवर देशातील पहिली सॅनिटायझेशन व्हॅन पुणे पोलिसांच्या सेवेत दाखल..

जगभरात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहे. यात महत्वाची जबाबदारी पोलीस प्रशासन पार पाडत असून 24 तास रस्त्यावर खडा पहारा दिला जात आहे. सामान्य माणसाप्रमाणे त्यांना देखील करोनाचा धोका आहेच.  या पार्श्वभूमीवर देशातील पहिली सॅनिटायझेशन व्हॅन पुणे पोलिसांच्या सेवेत दाखल झाली आहे. ‘संजीवनी’ नावाने या व्हॅनला संबोधले जात आहे. पोलिसांसाठी  अशा प्रकारचे वाहन असणारे पुणे शहर देशातील एकमेव असल्याचे बोलले जात आहे.

या अनोख्या वाहनाबाबत वाहतूक विभागाचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.अनिल पाटील सरांनी सांगितले की, करोना व्हायरस या आजारामुळे देशात लॉकडाउन आहे. या दरम्यान आमचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी 24 तास कामावर आहेत. त्या सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक भागात तैनात असणार्‍या कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल मिस्टींग सॅनिटायझर वाहन तयार करण्यात आले आहे. या वाहनात एखादा कर्मचारी साधारण 10 सेकंद थांबल्यास निर्जंतुकीकरण होण्यास मदत होणार आहे. या सर्वाचा परिणाम काही तास राहणार आहे. आता अशा प्रकारचे वाहन टप्प्या टप्प्याने शहरातील इतर भागात देखील सुरू केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


Post Bottom Ad

#

Pages