👌पुण्यात संचारबंदी व लॉकडाऊनच्या काळात वीज वितरण विभागाची कार्यतत्परता; विद्युत वाहक तुटलेल्या तारेची एक तासाच्या आत दुरुस्ती करून वीज पुरवठा केला सुरळीत.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, April 3, 2020

👌पुण्यात संचारबंदी व लॉकडाऊनच्या काळात वीज वितरण विभागाची कार्यतत्परता; विद्युत वाहक तुटलेल्या तारेची एक तासाच्या आत दुरुस्ती करून वीज पुरवठा केला सुरळीत..


👌 पुण्यात संचारबंदी व लॉकडाऊनच्या काळात वीज वितरण विभागाची कार्यतत्परता ; विद्युत वाहक तुटलेल्या तारेची एक तासाच्या आत दुरुस्ती करून वीज पुरवठा केला सुरळीत..

पुणे शहरात कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे संचारबंदी व लॉकडाऊनच्या काळात 24 तास कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीच्या पद्मावती विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये याअनुषंगाने कार्य तत्परतेने बिबवेवाडी, इंदिरानगर चौक येथील विद्युत वाहक तार तुटल्याने इंदिरानगर, अप्पर-सुपर, महेश सोसायटी व बिबवेवाडी या भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने त्वरित एका तासाच्या आत विद्युत वाहक तार दुरुस्ती करून रुग्णालय व नागरिकांना अखंडित वीजपुरवठा करण्याचे काम केले आहे. महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीच्या पद्मावती विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्परतेचे बिबवेवाडी येथील नागरिकांनी कौतुक केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका प्रयत्नशील असतांनाच रस्त्यावरील गर्दी रोखण्यासाठी पोलिस कर्मचारीही काम करीत आहेत. त्याचवेळी वीज वितरण विभागाचे अभियंते, तांत्रिक, अतांत्रिक कर्मचारी व अधिकारी यांच्या योगदानामुळे ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होत आहे. अखंडित वीजपुरवठा केल्यानेच पुणे शहरातील नागरिकांना घरातच थांबणे शक्य झाले आहे. त्यामुळेच अखंडित वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. प्रत्येक आव्हान   पेलण्यासाठी वीज वितरण कंपनीचे मुख्य कार्यकारी अभियंते यांच्या मार्गदर्शनात वीज कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत. वीज पुरवठा काही काळ खंडित झाला तर व्यक्ती अस्वस्थ होतात. मात्र, वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ऊन,वारा,पाऊस व थंडीत विजेच्या खांबावर चढून काम करणे अवघड आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी ग्राहक घरी असतांना घराबाहेर येऊन विज पुरवठा सुरू ठेवण्याचे जोखमीचे काम वीज कर्मचारी करीत आहेत.

महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीच्या पद्मावती विभागाचे मा.सहाय्यक अभियंते श्री. राहुल बेंद्रे यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी व लॉकडाऊनच्या काळात पुणे शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. पुणे शहरातील बाजारपेठ, आस्थापने व कार्यालय बंद झाले आहेत. नागरिकांना कामासाठी कार्यालयात जाता येत नसल्याने " वर्क फॉर्म होम " साठी वीज पुरवठा सुरळीत राहण्याकामी महावितरणे विशेष खबरदारी घेतली आहे. विज समस्या निर्माण होऊ नये, याकरिता पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीच्या पद्मावती विभागाचे मा.मुख्य कार्यकारी अभियंते श्री. मधुसूदन बरकवडे मा.सहाय्यक अभियंते श्री. राहुल बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑफिस असिस्टंट श्री. प्रवीण शितोळे , वायरमन - श्री. संदीप पाटणे , श्री. मनोहर वणवे , श्री. योगेश वाकलकर , श्री. गिरीश वरवटे , श्री. अतुल मगर , श्री. प्रशांत धुमाळ , श्री. दत्तात्रय पाटील , श्री. नवनाथ काटे , श्री. दीपक शिंदे यांच्या पथकाने बिबवेवाडीत एका तासाच्या आत खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम केले आहे.

Post Bottom Ad

#

Pages