🚨पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलिसांचे पथसंचलन.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, April 26, 2020

🚨पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलिसांचे पथसंचलन..


🚨 पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलिसांचे पथसंचलन..
करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमध्ये पुन्हा ३ मे पर्यंत वाढ करण्यात आली. करोनाच्या विरोधात डॉक्टर, आरोग्य, शासकीय व निमशासकीय कर्मचारी चोख भूमिका बजावत आहेत तसेच रस्त्यावर उतरून पोलीस ही आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. दरम्यान, कोंढवा पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी लोकांनी घराबाहेर पडू नये हा संदेश देण्यासाठी कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत शनिवार दि.२५ एप्रिल रोजी सायंकाळी ०४.४० ते ०५.३५ वा. दरम्यान कोंढवा पोलीस स्टेशन येथून पथ संचलनाला सुरुवात करत आशीर्वाद चौक - ज्योती चौक - एनआयबीएम चौक - बेकर्स पॉईंट या मार्गावर पथसंचलन करत रिम्स स्कूल याठिकाणी पथसंचलन समाप्त करण्यात आले.
या पथसंचलनात कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड यांच्या पुढाकारात कोंढवा पोलीस ठाण्याचे ९ API/PSI व ६० पोलीस कर्मचारी, RCP १ अधिकारी व १२ कर्मचारी, नियंत्रण कक्ष कडील कर्मचारी तसेच SRPF ग्रुप नं १ व २ कडील २ अधिकारी व ३७ कर्मचारी यांच्यासह पथसंचलन करण्यात आले.
करोना विषाणूचा फैलाव सुरुच असून भारतात याने अनेकांचा जीव घेतला आहे. वारंवार नागरिकांना आवाहन करूनही ते घराबाहेर पडत असल्याने कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड यांच्या आदेशानुसार कोंढवा पोलिसांनी कडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे लोकांचं घराबाहेर पडणं काहीसं कमी झालं आहे.
कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड यांचे मुस्लिम बांधवांना आवाहन..
कोरोना हे संपुर्ण मानवजातीवर ओढवलेले संकट आहे. या संकटात सर्वांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. या महामारीचा कोणत्याही धर्म, जातशी संबंध नसून, कोणत्याही अफवावर विश्‍वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करा. रमजान हा पवित्र उपासनेचा महिना असून, या महिन्यात संयमाची शिकवण मिळते. कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिक संयमाने लढा देत आहे. रमजानमध्ये प्रत्येक मुस्लिम समाजबांधव प्रशासनाच्या नियमांचे पालन करुन ही महामारी हद्दपार करण्यासाठी आपले योगदान देऊन घरातच रमजानची उपासना करावी, असे आवाहन कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड यांनी मुस्लिम बांधवांना केले.


Post Bottom Ad

#

Pages