💀उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांचा मेंदू डेड; मृत्यूबाबत माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चां.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, April 26, 2020

💀उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांचा मेंदू डेड; मृत्यूबाबत माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चां..


💀 उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांचा मेंदू डेड; मृत्यूबाबत माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चां..

उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांच्या मृत्यूबाबत माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चांना सुरवात झाली आहे. किम जोंग उन यांचा  मृत्यू झाला असून याबाबतची घोषणा  सोमवारी होणार असल्याची  माहिती माध्यमांमध्ये आली आहे.

हुकूमशहा किम जोंग उन यांच्यावर १२ एप्रिलला हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती. किम जोंग ऊन यांनी ११ एप्रिल रोजी सत्तारूढ पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी कोरानाविरुद्ध उपायावर चर्चा केली होती. त्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत. त्यांच्या आजोबांचीच जयंती होती. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीमुळे किम जोंग उन हे अस्वस्थ असल्याची चर्चा होऊ लागली.

तसेच किम जोंग उन यांची प्रकृती ढासळल्याने चीनने काल किमला वाचविण्यासाठी डॉक्टरांची टीमच कोरियाला पाठविली होती.  सर्वतोपरी किम जोंग उन यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र किम जोंग उन यांचा मेंदू डेड झाल्याचं माध्यमांमध्ये सांगण्यात येत आहे.

प्रकृतीच्या कारणामुळे किम यांना नेतेपद सोडावे लागले, तरी उत्तर कोरियात फारशी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता नाही. त्यांच्या बहीण किम यो जोंग यांचा सरकारमध्ये चांगलाच प्रभाव आहे. शिवाय किम परिवाराकडेच नेतृत्व ठेवण्याबाबत बहुतांश सदस्यांचे मत आहे.

Post Bottom Ad

#

Pages