💉लस बनवणार्या पुण्याच्या सेरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची दिलासादायक बातमी.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, April 27, 2020

💉लस बनवणार्या पुण्याच्या सेरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची दिलासादायक बातमी..


💉 लस बनवणार्या पुण्याच्या सेरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची दिलासादायक बातमी..

चीनमधून जगभर पसरलेल्या जीवघेण्या कोरोना व्हायरसवर प्रतिबंधक लस तयार करण्याचं काम अनेक प्रयोगशाळांमध्ये युद्धपातळीवर सुरू आहे. चीनमध्ये यासंबंधी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. तर चीनबाहेरही अनेक देशांमधले शास्त्रज्ञ यासंबंधी काम करत आहेत. त्यामुळे या आजारावर लस कधी निघणार हा सगळ्या जगाला पडलेला प्रश्न आहे.

पुण्याच्या सेरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि जगातल्या इतर ७ कंपन्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत कोरोनाची लस तयार करण्यासाठी पार्टनरशीप केली आहे. रविवारी लस बनवणारी कंपनी सेरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने दिलासादायक बातमी दिली आहे.

कोरोनाला हरवण्यासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या कोविड-१९ लसीचं उत्पादन दोन ते तीन आठवड्यात सुरू करायची योजना असल्याचं सेरम इन्स्टिट्यूटने सांगितलं आहे. या लसीचं मानवी परीक्षण यशस्वी राहिलं, तर ऑक्टोबर महिन्यात लस बाजारात येऊ शकते, असा दावाही कंपनीने केला आहे.

दरम्यान, सेरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पुनावाला म्हणाले, ‘कोविड-१९ची लस सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात बाजारात यायची आमची अपेक्षा आहे, फक्त लसीचं परीक्षण यशस्वी आणि सुरक्षित झालं पाहिजे. आम्ही पुढच्या २ ते ३ आठवड्यात या लसीचं टेस्टिंग भारतात सुरू करणार आहोत. भारतात ही टेस्टिंग सुरू करण्यासाठी आवश्यक मंजुरी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे,’ असं त्यांनी सांगितलं.

Post Bottom Ad

#

Pages