🚨 रस्त्यावर फिरणाऱ्या टोळक्याला हटकले म्हणून पोलिसांवरच हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना पोलिसांनी घेतले ताब्यात.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, April 10, 2020

🚨 रस्त्यावर फिरणाऱ्या टोळक्याला हटकले म्हणून पोलिसांवरच हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना पोलिसांनी घेतले ताब्यात..


🚨 रस्त्यावर फिरणाऱ्या टोळक्याला हटकले म्हणून पोलिसांवरच हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना पोलिसांनी घेतले ताब्यात..

संभाजीनगरात रस्त्यावर फिरणाऱ्या टोळक्याला हटकले म्हणून पोलिसांवरच हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना पोलिसांनी काहीवेळातच ताब्यात घेत कडक कारवाई केली आहे. पोलिसांवर त्यांच्याच लाठ्या घेऊन मारहाण करून पळ काढणाऱ्या त्या हल्लेखोरांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. त्यामुळे समाजातील सर्वच स्तरातून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. त्या दरम्यानच पोलिसांनी पळ काढणाऱ्या हल्लेखोरांना अडवून ताब्यात घेतले. शाहरुख, अश्रफ, समीर आणि अरबाज अशी या चौघांची नावे आहेत. पोलिसांनी तात्काळ केलेल्या कारवाईचे कौतुक होत आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गर्दी होऊ नये यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. गर्दी होऊ नये म्हणून पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. संचारबंदीच्या काळात रस्त्यवार मोकट फिरणाऱ्या टोळक्याला आवार घालणाऱ्या पोलिसांना त्याच्याच हातातील लाठी हिसकावून त्यांंना बेदम मारहाण केली. यामध्ये पोलीस कर्मचारी जखमी झाला. त्यानंतर टोळक दुचाकीवरुन निघून गेले. टोळक्याच्या या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त करत संताप व्यक्त केला जात होता.

लॉकडाऊन असल्यामुळे शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी बुधवार पासून सांयकाळी 7 पहाटे 7 पर्यंत संचारबंदी कडक करत पोलिसांना त्याची अमलबजावणी सक्तीने करा अशा सूचना दिल्या. मात्र गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील अण्णाभाऊ साठे चौकात कार्यरत असलेल्या पोलिसांनी रस्त्यावर ये जा करणाऱ्या टोळक्याला आडवून त्याची चौकशी केली असता त्याने उडवा उडवीचे उत्तर दिल्यामुळे पोलिसांनी त्याला लाठीचा प्रसाद दिला. दरम्यान टोळक्याच्या साथीदारांनी पोलिसांना जाब विचारात धक्काबुकी केली तर त्या टोळक्यातील एकाने पोलिसाच्या हातातील लाठी हिसकावून मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलीस कर्मचाऱ्याचा बचाव करण्यासाठी सहकारी सरसावले तरकाही जण मोबाईल मध्ये शुटिंग करु लागले मात्र टोळके आक्रमकपणे पोलिसांवर तुटुन पडत होते. या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली होती.

Post Bottom Ad

#

Pages