😔 पोलीस दलातील ५७ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनाने मृत्यू ; सर्वत्र हळहळ व्यक्त.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, April 26, 2020

😔 पोलीस दलातील ५७ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनाने मृत्यू ; सर्वत्र हळहळ व्यक्त..


😔 पोलीस दलातील ५७ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनाने मृत्यू ; सर्वत्र हळहळ व्यक्त..

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जवळपास सगळीकडेच कोरोनाचा शिरकाव झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील ५७ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. हे पोलीस कॉन्स्टेबल मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत होते. स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्याला अत्यावश्यक सुविधा आणि संरक्षण देणाऱ्या पोलीस दलात काही दिवसांपूर्वी कोरोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली होती. त्यातच आता पोलीस कॉन्स्टेबलच्या झालेल्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली हात आहे.

कोरोनाची लागण झाल्याचे लक्ष आल्यानंतर या पोलीस कॉन्स्टेबलला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. सर्वसामान्यांचे संरक्षण करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून सध्या राज्यासह देशभरातले सर्वच पोलीस सलग अनेक दिवस ड्युटीवर आहेत. गेले अनेक दिवस वारंवार सूचना करून लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत सर्वसामान्यांना सुरक्षा देत ते रस्त्यारस्त्यांवर उभे आहेत. मात्र, त्यामुळे पोलीस दलातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने सर्वसामान्यांना सुरक्षा देणाऱ्या पोलिसांच्या सुरक्षेचे काय ? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

Post Bottom Ad

#

Pages