🚨पुण्यात गांजा बाळगणाऱ्या आरोपीच्या कोंढवा पोलीसांनी आवळल्या मुसक्या; ४०७ ग्रँम वजनाचा ८१४० /- रूपये किंमतीचा गांजा व रोख रक्कम १२२०/- रुपये मुद्देमाल जप्त.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, April 4, 2020

🚨पुण्यात गांजा बाळगणाऱ्या आरोपीच्या कोंढवा पोलीसांनी आवळल्या मुसक्या; ४०७ ग्रँम वजनाचा ८१४० /- रूपये किंमतीचा गांजा व रोख रक्कम १२२०/- रुपये मुद्देमाल जप्त..


🚨 पुण्यात गांजा बाळगणाऱ्या आरोपीच्या कोंढवा पोलीसांनी आवळल्या मुसक्या; ४०७ ग्रँम वजनाचा ८१४० /- रूपये किंमतीचा गांजा रोख रक्कम १२२०/- रुपये मुद्देमाल जप्त..

पुण्यात कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे संचारबंदी व लॉकडाऊनच्या काळात अवैद्यरित्या गांजा जवळ बाळगणाऱ्या इसमाची माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक श्री.अमित साळुंखे यांना बातमीदारा मार्फत मिळताच मिळालेल्या माहितीच्या आधारे कोंढवा पोलीस ठाणे तपास पथकाच्या पोलिसांनी बोपदेव घाटात, महादेव मंदिरामागे छापा टाकुन आरोपीस अटक करून त्याच्याकडून ४०७ ग्रँम वजनाचा ८१४० /- रूपये किंमतीचा गांजा व रोख रक्कम १२२०/- रुपये असे एकूण ९३६०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गांजा जवळ बाळगणार्या असिफ रेहमतुल्ला अन्सारी (वय २३, रा.डायस फ्लॉट, गुलटेकडी पुणे) असे कोंढवा पोलीसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

कोंढवा पोलीसांनी गांजा जवळ बाळगणार्या आरोपीच्या अश्या आवळल्या मुसक्या..
शुक्रवार दि.०३ एप्रिल रोजी कोंढवा पोलीस ठाणे तपास पथकातील पोलीस नाईक श्री.अमित साळुंखे यांना एक इसम गांजा जवळ बाळगत असल्याची माहिती बातमीदारामार्फत मिळताच ही माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड यांना कळवत त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.महादेव कुंभार, मा.सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.चेतन मोरे, पोलीस हवलदार श्री.संतोष नाईक, पोलीस नाईक श्री.अमित साळुंखे, पोलीस नाईक श्री.राहुल माने यांनी बोपदेव घाटात,महादेव मंदिरामागे छापा टाकुन आरोपी असिफ रेहमतुल्ला अन्सारी (वय २३, धंदा. शिलाईकाम, रा.डायस फ्लॉट, गुलटेकडी पुणे) यास ताब्यात घेत चौकशी केली असता त्याच्याकडे ४०७ ग्रँम वजनाचा ८१४० /- रूपये किंमतीचा गांजा व रोख रक्कम १२२०/- रुपये असे एकूण ९३६०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून कोंढवा पोलीस ठाणेमध्ये आरोपी असिफ अन्सारी याच्यावर एन.डी.पी.एस ॲक्ट (क),२०(ब) (२)(अ) अन्वेय प्रमाणे गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

गांजा जवळ बाळगणारा आरोपी असिफ रेहमतुल्ला अन्सारी याने गांजा कोठून आणला व त्याचे पुढे तो काय करणार होता ? याचा पुढील तपास कोंढवा पोलीस ठाणे तपास पथकातील मा.सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.चेतन मोरे करीत आहेत.

सदरची कामगिरी,
मा.अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री.सुनील फुलारी, मा.पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर श्री.सुहास बावचे, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे श्री.सुनील कलगुटकर, कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड व कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार कोंढवा पोलीस ठाणे तपास पथकाचे मा.सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.चेतन मोरे, पोलीस हवलदार श्री.संतोष नाईक, पोलीस नाईक श्री.अमित साळुंखे, पोलीस नाईक श्री.सुशिल धिवार, पोलीस नाईक श्री.संजिव कळंबे, पोलीस नाईक श्री.राहुल माने, पोलीस शिपाई श्री.उमेश शेलार, पोलीस शिपाई श्री.जोतिबा पवार, पोलीस शिपाई श्री.किरण मोरे यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages