🚨 पुणे शहरातील सर्व नागरिकांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य; मास्कचा वापर नकेल्यास होणार कठोर कारवाई.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, April 8, 2020

🚨 पुणे शहरातील सर्व नागरिकांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य; मास्कचा वापर नकेल्यास होणार कठोर कारवाई..


🚨 पुणे शहरातील सर्व नागरिकांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य; मास्कचा वापर नकेल्यास होणार कठोर कारवाई..

पुणे पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये अनेक ठिकाणी लोकसंखेची घनता अतिशय दाट असल्याने कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रसार होण्यासाठी पोषक स्थिती उपलब्ध आहे. सदयस्थितीत पुणे शहरात कोरोना विषाणुच्या संसर्गाची लक्षणे आढळुन येत असलेल्या व्यक्ती मोठया संख्येने उपचारासाठी शासकीय व खाजगी दवाखान्यात दाखल होत आहेत. त्याचेवेळेला वैदयकीय तपासणीअंती कोरोना विषाणुचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार कोरोना विषाणुच्या प्रसाराच्या या टप्प्यात कोरोना विषाणुचा संसर्ग कित्येक पटीने वाढुन पुणे शहरातील लोकसंख्या बाधित होवु शकते. कोरोना विषाणुच्या या वाढत्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी वैदयकीस तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार मास्क, हॅण्डग्लोज, सॅनिटायझरचा वापर व सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे अत्यावश्यक आहे.

साथरोग अधिनियम १८९७ मधील तरतुद व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ६८ व सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील अधिनिसुचेनुसार नेमलेले सक्षम अधिकारी म्हणजेच पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी सुचित केलेप्रमाणे यापुर्वी निर्गमित केलेल्या विविध मनाईच्या आदेशांनुसार मा.पोलीस सह आयुक्त पुणे शहर श्री.डॉ.रवींद्र शिसवे यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांनी मास्कचा वापर करणेबाबत आज दि.०८/०४/२०२० रोजी पासुन निर्देश देण्यात आले आहे.

Post Bottom Ad

#

Pages