🚨पुण्यात अवैद्य गुटख्याची तस्करी करणाऱ्यांचा कोंढवा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करत आवळल्या मुसक्या.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, April 27, 2020

🚨पुण्यात अवैद्य गुटख्याची तस्करी करणाऱ्यांचा कोंढवा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करत आवळल्या मुसक्या..


🚨 पुण्यात अवैद्य गुटख्याची तस्करी करणाऱ्यांचा कोंढवा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करत आवळल्या मुसक्या..

राज्यात कोरोना विषाणुंचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळातही गुटख्याची तस्करी करणाऱ्यांचा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करत मुसक्या आवळल्या. या कारवाईत २ लाख ११ हजार १६० रुपयांचा गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थ आणि दीड लाख रुपये किमतीचा टेम्पो जप्त करण्यात आला. याप्रकरणी चालक शोहराब सरवर अली याला अटक करण्यात आली आहे.

अवैद्य गुटख्याची तस्करी करणाऱ्यांचा कोंढवा पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या..
राज्यात गुटखाबंदी असल्याने काही जण इतर राज्यातून आणून त्याची बेकायदेशीर विक्री करत आहे. अनेक जण अत्यावश्यक सेवा देण्याच्या नावाखाली गोरखधंदे करत आहे. नुकतंच अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली एका टेम्पोतून गुटख्याची वाहतूक सुरु होती. हा टेम्पो कात्रज येथून खडीमशीन चौक कोंढवा या मार्गावरून भरधाव वेगाने जात असताना पेट्रोलिंग करत असलेले कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सुशील धिवार व पोलीस नाईक अमोल फडतरे यांनी थांबण्याचा इशारा केला असता तो न थांबता जोरात जाऊ लागल्याने टेम्पोचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करत कोंढवा पोलीस स्टाफच्या मदतीने भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पोला शिव-पार्वती हॉटेल कोंढवा बुद्रुक याठिकाणी अडवून टेम्पोचा वाहनचालक शोहराब सरदर अली उर्फ शोएव (वय २१, सध्या रा.अप्पर इंदिरानगर,बिबवेवाडी पुणे. मुळ रा.उत्तरप्रदेश) यास ताब्यात घेत टेम्पोची झाडाझडती घेतली असता. टेम्पोमधील ७ प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये २,११,१६० रुपये किंमतीचा गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थ आणि १,५०,००० लाखाचा टेम्पो असे एकूण ३ लाख ६१ हजार १६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुटख्याची अवैध वाहतूक करणारा आरोपी शोहराब अली उर्फ शोएव याच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुरन ५५२/२०२० भादवी कलम १८८.२७२,२७३.२६९.अन्न सुरक्षा व मानद कायदा २००६ चे कलम २६(२/i), २६(२yiv). २७(३)/d) सह वाचन ३(i).ZZ).(v) व महाराष्ट्र कोहिड १९ उपाययोजना सन २०२०चे कलम ११ अन्वये गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी,
मा.पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री.सुनिल फुलारी,
मा.पोलीस उपायुक्त परीमंडळ-५ पुणे शहर श्री.सुहास बावचे,
मा.सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री.सुनिल कलगुटकर,
कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड, कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री.संतोष शिंदे, पोलीस हवालदार श्री.सुरेश भापकर, पोलीस नाईक श्री.सुशील धिवार, पोलीस नाईक श्री.गणेश आगम, पोलीस नाईक श्री.अमोल फडतरे, पोलीस शिपाई श्री.किरण मोरे, पोलीस शिपाई श्री.उमाकांत स्वामी यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages