🛅 दुकानदार व बँक कर्मचाऱ्यांना राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे मार्गदर्शक तत्वे.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, April 19, 2020

🛅 दुकानदार व बँक कर्मचाऱ्यांना राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे मार्गदर्शक तत्वे..


🛅 दुकानदार व बँक कर्मचाऱ्यांना राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे मार्गदर्शक तत्वे..

कोरोना विषाणूने जगभारात हैदोस घातला आहे. भारतातही ३ मेपर्यत लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. तसेच, नागरिकांचे हाल होणार नाही यासाठी जीवनावश्यक बाबी सुरु ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दुकानदार, बँक कर्मचारी यांनी व्यवहार करताना काय खबरदारी घ्यावी याची मार्गदर्शक तत्वे राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने जारी केली आहे.

काय आहे मार्गदर्शक सूचनांची यादी..
बॅंक कर्मचाऱ्यांनी आणि दुकानगारांनी नोटा हाताळल्यानंतर लॅनिटायझरचा वापर करावा.

दुकानदारांनी अन्न पदार्थ हाताळल्यानंतर सॅनिटायझरचा वापर करावा.

दुकानाच्या बाहेर ग्राहकांनी १ मीटरचे अंतर ठेवून उभे राहावे.

दुकान-आस्थापनांमध्ये स्वच्छता राखा.

मास्कचा वापर अनिवार्य.

ग्राहकांसाठी वेगळे सॅनिटायझर ठेवा.

अन्नपदार्थ हाताळमाऱ्या व्यक्तींची वैद्यकीय चाचणी करावी.

मुदतबाह्य अन्नपदार्थांची विक्री करु नका.

या कालाधीत फक्त परवानाधारक- नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडूनच अन्न पदार्थ खरेदी करा.

या सूचनांचे पालन न केल्यास अन्न व औषझ प्रशासन विभागाच्या वतीने कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Post Bottom Ad

#

Pages