🕯कॅन्सरशी झुंज देत वयाच्या ५३ व्या वर्षी बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता इरफान खान यांनी घेतला जगाचा निरोप.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, April 29, 2020

🕯कॅन्सरशी झुंज देत वयाच्या ५३ व्या वर्षी बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता इरफान खान यांनी घेतला जगाचा निरोप..


🕯 कॅन्सरशी झुंज देत वयाच्या ५३ व्या वर्षी बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता इरफान खान यांनी घेतला जगाचा निरोप..
बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता इरफान खान याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. दीर्घकाळापासून कॅन्सरशी झुंज देत असलेल्या इरफानने आज अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी अचानक तब्येत बिघडल्यामुळे इरफानला कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते.
मात्र, वयाच्या ५३ व्या वर्षी इरफान खान यांनी जगाचा निरोप घेतला आहे. इंग्लिश मीडियम हा इरफान खान यांचा शेवटचा चित्रपट ठरला. चाणक्य या हिंदी मालिकेद्वारे त्यांनी सिनेसृष्टीत पदापर्ण केलं. त्यानंतर 1994 मध्ये द ग्रेट मराठा या मालिकेत त्यांना रोहिल्ला सरदारची भूमिका साकारली होती.

तसेच ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटात इरफान खान यांनी आपल्या मुलीचं परदेशी शिकण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊन धडपडणाऱ्या वडिलांची भूमिका केली आहे. ही भूमिका आणि त्याचा वास्तवात सुरू असलेला झगडा यातले साम्य इरफान खान यांनी सांगितले.

याबाबत दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, मरणाच्या भीतीपेक्षा दुसरं वाईट काय असू शकतं? जगायचं आहे की मृत्यू जवळ करायचा आहे..? अत्यंत अशक्य परिस्थितीशी सामना करताना जे जे प्रयत्न केले जातात त्या सगळ्या गोष्टी मला जवळच्या वाटतात,’ असं त्यांनी म्हंटले होते.

Post Bottom Ad

#

Pages