🚨 पुण्यात लॉकडाऊनमध्ये अनधिकृतपणे देशी,विदेशी दारुची विक्री करणाऱ्या इसमास कोंढवा पोलिसांनी केली अटक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, April 3, 2020

🚨 पुण्यात लॉकडाऊनमध्ये अनधिकृतपणे देशी,विदेशी दारुची विक्री करणाऱ्या इसमास कोंढवा पोलिसांनी केली अटक..


🚨 पुण्यात लॉकडाऊनमध्ये अनधिकृतपणे देशी,विदेशी दारुची विक्री करणाऱ्या इसमास कोंढवा पोलिसांनी केली अटक..

पुण्यात संचारबंदी व लॉकडाऊनच्या काळात देशी व विदेशी मद्याची अवैधपणे विक्री करत असल्याची मिळालेल्या माहितीच्या आधारे श्रीकमलेश हॉटेलच्या बाजूला, कामठे पाटीलनगर, कोंढवा बुद्रुक याठिकाणी कोंढवा पोलिसांनी छापा टाकून १३,६७०/- रुपये किंमतीच्या देशी, विदेशी मद्दयाच्या बाटल्या व रोख रक्कम ८३००/- रुपये असा एकूण २१,९७०/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत आरोपीस अटक करण्यात आल्याची घटना शुक्रवार दि. ०३ एप्रिल रोजी उघडकीस आली आहे.

संचारबंदी व लॉकडाऊनच्या काळात मद्याचे अवैधपणे विक्री करणारा इसम अमित महेश जगताप (वय ३१, रा.गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रोड, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,
भारत देशामध्ये व ईतर देशामध्ये कोरोना विषाणुचा संसर्ग झाला आहे त्याअनुषंगाने मा.प्रधानमंत्री यांनी
मंगळवार दि.१४ एप्रिल २०२० पर्यंत संपुर्ण देशामध्ये लॉक डावुनची घोषणा केल्याने देशामध्ये जीवानाश्यक वस्तुंचे विक्री व्यतिरीक्त अन्य वस्तुंचे विक्रीवर संपुर्णपणे पुढील आदेशापर्यंत बंधने घालण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मद्दविक्री, सिगारेट, गुटखा, तंबाखु यावस्तुवर बंदी घातली असल्याने त्याचा फायदा काही समाजकंटक घेत असुन नागरिकांची तलब पुर्ण करण्याकरीता चढ्या दराने मद्द व अन्य पदार्थाची विक्री शुक्रवार दि. ०३ एप्रिल रोजी कोंढवा पोलीस ठाणे हद्दीमध्ये करीत असल्याची बातमी कोंढवा पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रगटीकरण शाखेकडे नेमणुकीस असलेले पोलीस नाईक श्री.सुशील धिवार यांना त्याच्या बातमीदारा मार्फत खडीमशिन चौक कोंढवा परीसरामध्ये वेगवेगळया बँडची विदेशी व देशी दारू लोकांना चोरून विक्री करीत असल्याची खात्रीशीर बातमी मिळताच हि माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.महादेव कुंभार यांना कळवत त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.दिपक बर्गे, पोलीस हवलदार श्री.सुरेश भापकर, पोलीस हवलदार श्री.विशाल गवळी, पोलीस नाईक श्री.सुशील धिवार, पोलीस नाईक श्री.गणेश आगम, पोलीस शिपाई श्री.किरण मोरे यांनी मिळालेल्या बातमीच्या आधारे श्रीकमलेश हॉटेलच्या बाजूला, कामठे पाटीलनगर याठिकाणी सापळा रचून आरोपी अमित महेश जगताप (वय ३१, रा.गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रोड, पुणे) ह्याला त्याच्या खाजगी वाहनाने दोन मोठे बॉक्स व प्लास्टीकची गोणी सकट ताब्यात घेऊन चौकशी करत अंगझडती घेतली असता त्याचेकडे रोख रक्कम ८३००/- रुपये व १३,६७०/- रुपये किंमतीच्या देशी, विदेशी मद्दयाच्या बाटल्या असा एकूण २१,९७०/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन त्याचे विरुध्द कोंढव पोलीस ठाणेमध्ये गु.र.न ३१५/२०२० मुंबई प्रोव्हिबीशन अॅक्ट कलम ६५ (ड) अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी,
मा.पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री.सुनिल फुलारी, मा.पोलीस उपआयुक्त परीमंडळ-५ पुणे शहर श्री.सुहास बावचे, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री.सुनिल कलगुटकर, कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड व कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.महादेव कुंभार यांच्या मार्गदशनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.दिपक बर्गे, पोलीस हवलदार श्री.सुरेश भापकर, पोलीस हवलदार श्री.विशाल गवळी, पोलीस नाईक श्री.सुशील धिवार, पोलीस नाईक श्री.गणेश आगम, पोलीस शिपाई श्री.किरण मोरे यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages