💉कोंढवातील हसीना इनामदार यांनी दहा खासगी डॉक्‍टरांचे पथक आरोग्य यंत्रणेला केले उपलब्ध; "डॉक्‍टर आपल्या दारी" या उपक्रमाला मिळाली गती.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, April 21, 2020

💉कोंढवातील हसीना इनामदार यांनी दहा खासगी डॉक्‍टरांचे पथक आरोग्य यंत्रणेला केले उपलब्ध; "डॉक्‍टर आपल्या दारी" या उपक्रमाला मिळाली गती..


💉 कोंढवातील हसीना इनामदार यांनी दहा खासगी डॉक्‍टरांचे पथक आरोग्य यंत्रणेला केले उपलब्ध; "डॉक्‍टर आपल्या दारी" या उपक्रमाला मिळाली गती..

पुणे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाची आरोग्य यंत्रणा कोरोना विरोधात लढत आहे. मात्र, डॉक्‍टरांवर कामाचा ताण येत आहे. ही समस्या लक्षात घेऊन पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या सदस्य हसीना इनामदार यांनी दहा खासगी डॉक्‍टरांचे पथक आरोग्य यंत्रणेला उपलब्ध करून दिले आहे. यामुळे "डॉक्‍टर आपल्या दारी" उपक्रमाला गती मिळाली आहे.

शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा राबवत आहे. "डॉक्‍टर आपल्या दारी" या उपक्रमा अंतर्गत घरोघरी जाऊन संशयित रूग्णाचे "स्वॅब' घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. मात्र, सरकारी डॉक्‍टर आणि परिचारिकांची संख्या अपुरी पडत असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण येत आहे. त्यामुळे खासगी डॉक्‍टरांनी पुढे येण्याचे आवाहन महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत इनामदार यांनी आरोग्य यंत्रणेच्या दिमतीला दहा डॉक्‍टरांचे पथक उपलब्ध करून दिले आहे. ते कोंढवा परिसरात काम करीत आहे.

इमानदार म्हणाल्या..
"डॉक्‍टरांचे हे पथक घरोघरी जाऊन नागरिकांना कोरोनाचा संसर्ग टाळण्याबाबत सल्ला देत असून आवश्‍यक उपचारही केले जात आहे. ते सुमारे पावणेदोनशे कुटुंबांपर्यंत पोचत आहेत.''

Post Bottom Ad

#

Pages