😱 पुणेकरांची चिंता वाढली; आज आणखीन २ नवे रुग्ण आढळल्याने करोना रुग्णांची संख्या २०४ तर मृतांचा आकडा २०.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, April 9, 2020

😱 पुणेकरांची चिंता वाढली; आज आणखीन २ नवे रुग्ण आढळल्याने करोना रुग्णांची संख्या २०४ तर मृतांचा आकडा २०..


😱 पुणेकरांची चिंता वाढली; आज आणखीन २ नवे रुग्ण आढळल्याने करोना रुग्णांची संख्या २०४ तर मृतांचा आकडा २०..

कोरोनाचा संसर्गामुळे राज्याच्या विविध भागात चिंताजनक परिस्थिती निर्माण होत आहे. विशेषतः मुंबई-पुण्यात रुग्णांच्या आकड्याबरोबर मृतांचा आकडा वाढू लागल्यानं सरकारची चिंता दिवसागणिक वाढत चालली आहे. आजही पुणे शहर आणि जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यातील एकजण बारामतीतील असून इतर १९ जण पुण्याच्या हद्दीतील असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२९७ झाली आहे. कोरोना बाधित ११७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १०७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात आज आणखी दोन नवे रुग्ण आढळल्याने पुण्यातील करोना रुग्णांची संख्या २०४ वर गेली आहे. पुणे शहरात १६८, पिंपरी-चिंचवडमध्ये २२ आणि पुणे ग्रामीणमध्ये १४ रुग्ण आढळले आहेत. तर पुण्यातील मृतांचा आकडा २० वर गेला आहे, असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.

राज्यात मुंबईत करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ पुण्यातही करोनाचे सर्वाधिक मृत्यू आढळले आहेत. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे.

Post Bottom Ad

#

Pages