🚨राज्यात लॉकडाऊनमध्ये कलम १८८ नुसार ६९,३७४ गुन्हे दाखल करत १४,९५५ व्यक्तींना केली अटक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, April 26, 2020

🚨राज्यात लॉकडाऊनमध्ये कलम १८८ नुसार ६९,३७४ गुन्हे दाखल करत १४,९५५ व्यक्तींना केली अटक..


🚨 राज्यात लॉकडाऊनमध्ये कलम १८८ नुसार ६९,३७४ गुन्हे दाखल करत १४,९५५ व्यक्तींना केली अटक..

राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात २२ मार्च ते २४ एप्रिल या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ६९,३७४ गुन्हे दाखल झाले असून १४,९५५ व्यक्तींना अटक करण्यात आली.तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी ६३ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.

उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबर वर ७७ह जार ६७० फोन आले असून त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे, अशा ६०२ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १०८४ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले.त्याचप्रमाणे ४५हजार १६८ वाहने जप्त करण्यात आली. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदविण्यात आले आहेत.

पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांची प्रकरणे..
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १४८ घटनांची नोंद झाली असून यात ४७७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील २४तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने १५पोलीस अधिकारी व ८१पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ३ पोलीस अधिकारी व ४ कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून उरलेल्या १२ पोलीस अधिकारी व ७७ पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Post Bottom Ad

#

Pages