🙏 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्षय्य तृतीया; "साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त अक्षय तृतीया"चे महत्व जाणून घ्या.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, April 25, 2020

🙏 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्षय्य तृतीया; "साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त अक्षय तृतीया"चे महत्व जाणून घ्या..


🙏 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्षय्य तृतीया; "साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त अक्षय तृतीया"चे महत्व जाणून घ्या..

वैशाख महिन्यात शुक्ल पक्षात येणारा अक्षय्य तृतीया हा सण हिंदू धर्मियांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो. हिंदूंमध्ये साडेतीन मुहूर्त किंवा चार दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात, त्यातला एक दिवस म्हणजे अक्षय्य तृतीया. वैशाख महिन्यात शुक्ल पक्षातला तिसरा दिवस म्हणजे अक्षय्य तृतीया. यंदा २६ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे. करोना व्हायरसमुळे घेण्यात आलेल्या लॉकडाउनमध्येच यंदा अक्षय्य तृतीया साजरी करावी लागणार आहे.

चैत्र शुद्ध तृतीयेस मत्स्य जयंती असते. चैत्र शुद्ध नवमीस रामजन्म, वैशाख शुद्ध द्वादशीस भगवंती देव जयंती, वैशाख शुद्ध चतुर्दशी नृसिंह जयंती, वैशाख पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा असे विष्णूचे अनेक अवतार या महिन्यात झाले म्हणूनही त्याची पूजा वैशाख महिन्यात पुण्यकारक मानली गेली असेल.

अक्षय्य तृतीया शुभ मुहूर्त..
यंदा अक्षय्य तृतीया पुजेचा शुभ मुहूर्त २६ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून ४५ मिनिटं ते दुपारी १२ वाजून १९ मिनिटं असा आहे. तर अक्षय्य तृतीयेला २५ एप्रिल सकाळी ११ वाजून ५१ मिनिटांला सुरू होऊन २६ एप्रिल रोजी दुपारी एक वाजून २२ मिनिटाला संपेल.

अशी एक श्रद्धा आहे की अक्षय्य तृतीयाला सोने खरेदी केलं तर घरात कायम संपत्ती येते असा समज आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अनेकजण सोन्यांची खरेदी करतात. सोने खरेदी खेरीजही नवीन उपक्रम, उद्योग सुरू करण्यासाठीही हिंदूंमध्ये हा दिवस अत्यंत योग्य असा मानण्यात येतो. हिंदूंचे थोर संचित व महाकाव्य असलेलं महाभारत लिहिण्यास वेद व्यासांनी आजच्याच मुहूर्तावर सुरूवात केली होती अशी मान्यता आहे.

संस्कृतमध्ये अक्षय्य या शब्दाचा अर्थ आहे, ज्याचा कधीच क्षय होत नाही, जे कधीच संपत नाही असं. या दिवशी सोने खरेदी करणं म्हणजे कुबेराची मर्जी राखणं, त्याला खूश करणं, जेणे करून घरात कायम संपत्तीचा वरदहस्त राहील असा समज आहे. याच दिवशी परशुरामाचाही जन्म झाल्याचं मानण्यात येतं. भगवान विष्णूचा सहावा अवतार असलेल्या परशुरामाचीही आज आराधना करण्यात येते. भगवान विष्णू व त्याची पत्नी लक्ष्मी यांची पूजा केली तर सुख व समृद्धी येते अशी हिंदूंची श्रद्धा आहे.

Post Bottom Ad

#

Pages