🚨पुण्यात संचारबंदीच्या काळात लाचप्रकरणी दोन पोलीस कर्मचारी निलंबित.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, April 27, 2020

🚨पुण्यात संचारबंदीच्या काळात लाचप्रकरणी दोन पोलीस कर्मचारी निलंबित..


🚨 पुण्यात संचारबंदीच्या काळात लाचप्रकरणी दोन पोलीस कर्मचारी निलंबित..

संचारबंदीच्या काळात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानदारावर कारवाई न करण्यासाठी पैशाची मागणी केल्याप्रकरणी पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनमधील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

कोंढवा खडीमशीन पोलीस चौकीत कार्यरत असलेले पोलीस शिपाई (बक्कल क्रं. 8200) हर्षल मांढरे आणि (8302) सागर सूर्यवंशी याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार,
कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे पुणे शहरातल्या अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने देखील बंद करून घरात बसावे, असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले होते. त्यानुसार संपूर्ण पुणे शहरामध्ये बंद पाळण्यात आला. परंतु कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवार दि.25 एप्रिल रोजी कोंढवा खडीमशीन चौकीच्या परिसरात मार्शलच्या ड्युटीवर कार्यरत असलेले पोलीस शिपाई मांढरे आणि पोलीस शिपाई सूर्यवंशी हे एका किराणा दुकानात दोघे गेले असता दुकानात फक्त अत्यावश्यक वस्तू विक्रीस परवानगी आहे असे म्हणत दुकानाची झडती घेतली असता एका बरणीमध्ये तंबाखूजन्या पदार्थाच्या पुढ्या मिळून आल्या. दुकानदाराच्या विरोधात कारवाई न करण्यासाठी संबंधीत पोलीस कर्मचाऱ्यांनी 5 हजार रुपयांची मागणी केली असता तडजोडी अंती 2 हजार 300 रुपये अनोळखी महिलेच्या माध्यमातुन घेतले. या घटनेची तक्रार कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांना मिळताच त्यांनी घडलेल्या घटनेची चौकशी करून घटनेच्या चौकशीचा अहवाल पोलीस आयुक्त सुहास बावचे यांना दिला त्यावरून पोलीस आयुक्तांनी तातडीने कोंढवा पोलीस शिपाई - हर्षल मांढरे आणि पोलीस शिपाई - सागर सूर्यवंशी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

निलंबित पोलीस शिपाई यांनी केलेल्या कृत्याबद्दल पोलीस दलात आश्चर्य व्यक्त केले असून एका बाजूला कोरोना व्हायरशी दोन हात करण्यासाठी पोलिस दल अहोरात्र कर्तव्य बजावत असताना निलंबित पोलीस शिपाई यांनी केलेल्या कृत्याबद्दल नाराजीचे सूर उमटत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages