😱 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळं पुणेकरांच्या चिंतेत वाढ.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, April 5, 2020

😱 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळं पुणेकरांच्या चिंतेत वाढ..


😱 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळं पुणेकरांच्या चिंतेत वाढ..

मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये २१ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहे. यात पुणे शहरात १७ तर पिंपरी-चिंचवडमध्ये ४ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. या रुग्णामुळं पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पुणे पिंपरी -चिंचवडमध्ये करोनाग्रस्तांचा आकडा आता १०३ वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत पुण्यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या रोज वाढत असून रविवारी सकाळी १२ वाजेपर्यंत ही संख्या ६६१ वर गेली. राज्यात सर्वाधिक करोना रुग्णांची संख्या मुंबईत आहे. मुंबईत आतापर्यंत ३७७ रुग्णांची नोंद झाली आहे. तर पुणे १०३, ठाणे ७७, सांगली २५, नागपूर १७, अहमदनगर २०, लातूर ८, बुलडाणा ८, सातारा ३, औरंगाबाद ५, उस्मानाबाद ३, कोल्हापूर २ अशी सर्वाधिक नोंद झालेल्या राज्यातील इतर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी आहे.


Post Bottom Ad

#

Pages