🚨पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येरवडा कारागृहातून जामीनावर सूटलेल्या गुन्हेगाराचा खून.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, April 20, 2020

🚨पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येरवडा कारागृहातून जामीनावर सूटलेल्या गुन्हेगाराचा खून..


🚨 पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येरवडा कारागृहातून जामीनावर सूटलेल्या गुन्हेगाराचा खून..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग होऊ नये यासाठी येरवडा कारागृहातून जामीनावर सोडलेल्या एका गुन्हेगाराचा पदपथावर झोपलेल्या अवस्थेत अज्ञातानी धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचा धक्कादायक घटना बंडगार्डन परिसरात घडली आहे. याघटने प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या खिशामध्ये कारागृहातून सुटल्याच्या कागदा वरून मुन्ना ईश्वर चव्हाण (वय 23) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

बंडगार्डन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पुणे रेल्वे पोलीस ठाण्यातील हद्दीत चोरी केल्यामुळे मुन्नावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. तेंव्हापासून तो येरवडा कारागृहात होता. दरम्यान, कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या आदेशानुसार अनेक कैद्यांना जामिनावर सोडण्यात आले आहे. त्यानुसार येरवडा कारागृहातून चार ते पाच दिवसांपूर्वी मुन्नाची जामिनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर तो बंडगार्डन परिसरात पदपथावर राहत होता. सोमवारी सकाळी नागरिकांना एकजण पदपथावर रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती बंडगार्डन पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पाहणी केली आसता मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या खिशामध्ये कारागृहातून सुटल्याबाबत कागद मिळून आल्याने बंडगार्डन पोलिसांना तरुणाची ओळख पटवली आहे.

दरम्यान, मुन्नाचा खून कोणी केला याचा पुढील तपास बंडगार्डन पोलिस करत आहेत. बंडगार्डन पोलिस परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages