💉अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना कोट्यवधी औषधाचा डोस देण्याची केली विनंती.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, April 7, 2020

💉अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना कोट्यवधी औषधाचा डोस देण्याची केली विनंती..


💉 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना कोट्यवधी औषधाचा डोस देण्याची केली विनंती..

कोरोना विषाणू अमेरिकेत कहर करत आहे. अमेरिकेत दिवसागणीक सरासरी ५०० ते ६०० लोकांचे मृत्यू होत आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताकडून हायड्रॉक्सीक्लोरोक्विन अर्थात मलेरियावरील औषधाच्या मदतीची अपेक्षा केली आहे. रविवारी सकाळी मी पंतप्रधान मोदींशी या विषयावर चर्चा केली आहे. जर त्यांनी औषध पुरवठा करण्यास परवानगी दिली तर आम्ही त्यांच्या या निर्णयाचे कौतुक करू. त्यांनी सहकार्य न केल्यास काही फरक पडत नाही. परंतु आपल्याकडूनही अशाच प्रकारच्या प्रतिसादाची अपेक्षा ठेवा, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

अमेरिकेत कोरोना विषाणूच्या संसर्गाचे ३ लाख ६७ हजार ४ रुग्ण आहेत. तर १० हजार ८७१ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोनाने अक्षरश: थैमान घातलं आहे. या विषाणूवर आजपर्यंत कोणताही उपचार सापडलेला नाही. आता अमेरिका आणि जगातील शास्त्रज्ञ या विषाणूविरूद्ध लस शोधण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत जेणेकरून लोकांचे जीव वाचू शकतील. या महामारीमुळे आतापर्यंत जगात ७४ हजार ६९७ लोक मरण पावले आहेत. त्याचवेळी १३ लाख ४६ हजार ५६६ जण संक्रमित आहेत.

ट्रम्प प्रशासन काही प्राथमिक निकालांच्या आधारे कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन वापरण्यावर भर देत आहे. हे औषध मलेरियाच्या उपचारांमध्ये अनेक दशकांपासून वापरले जाते. गेल्या शनिवारी अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने त्वरित मान्यता दिल्यामुळे, न्यूयॉर्कमध्ये अंदाजे १,५०० कोरोना रूग्णांवर मलेरियाचे औषध वापरुन उपचार केले जात आहेत. ट्रम्प यांच्या मते, औषधाचे सकारात्मक परिणाम आहेत. त्यांनी पत्रकारांना सांगितलं की जर ते यशस्वी झाले तर ते स्वर्गातील भेटीसारखं असेल. अमेरिकेच्या आरोग्य तज्ञांचा अंदाज वर्तवला आहे की, पुढील कित्येक आठवड्यांमध्ये कोरोना विषाणूमुळे एक लाख ते दोन लाख मृत्यू होऊ शकतात.

कोरोना विषाणूच्या उपचारात यशस्वी औषध होण्याच्या आशेने अमेरिकेने आधीच सुमारे 29 दशलक्ष डोस साठवले आहेत. या संदर्भात ट्रम्प यांनी मोदींना अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचे ​​कोट्यवधी डोस देण्याची विनंती केली आहे. भारत हे औषध मोठ्या प्रमाणात तयार करतं.

Post Bottom Ad

#

Pages