😷 कोरोनाचा प्रादुर्भाव थांबत नसेल तर लॉकडाऊन वाढवण्याशिवाय काहीही पर्याय नाही; आरोग्य मंत्री राजेश टोपे.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, April 25, 2020

😷 कोरोनाचा प्रादुर्भाव थांबत नसेल तर लॉकडाऊन वाढवण्याशिवाय काहीही पर्याय नाही; आरोग्य मंत्री राजेश टोपे..

प्रशासक 

😷 कोरोनाचा प्रादुर्भाव थांबत नसेल तर लॉकडाऊन वाढवण्याशिवाय काहीही पर्याय नाही; आरोग्य मंत्री राजेश टोपे..

सध्या देशात लॉकडाउनचा दुसरा टप्पा सुरु आहे. हा लॉकडाउन येत्या ३ मे रोजी संपणार आहे. येत्या ४ मे रोजी देशासह राज्यातील लॉकडाऊन कदाचित मागे घेतला जावू शकतो. पण मुंबई आणि पुण्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता या दोन्ही शहरात १८ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो. कदाचित या दोन्ही शहरांमधील कंटेन्मेंट झोनपर्यंत हा निर्णय मर्यादित असू शकतो, अशी शक्यता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ‘लाइव्ह मिंट’ या वृत्तसंस्थेशी बोलताना ही वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई-पुणेकरांना ३ मे नंतर आणखी १५ दिवस घरात थांबावं लागण्याची शक्यता आहे.

ते म्हणाले कि, ”कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये या कारणानेच लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. पण जर प्रादुर्भाव थांबत नसेल तर लॉकडाऊन वाढवण्याशिवाय काहीही पर्याय नाही" असे राजेश टोपे यांनी सांगितले. झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाच्या केसेस झपाट्याने वाढत आहेत, ही सध्याची चिंतेची बाब आहे. सर्व कंटेन्मेंट झोन पूर्णपणे बंद आहेत की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. गरज पडल्यास ३ मे नंतर फक्त मुंबई, पुण्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये आम्ही आणखी १५ दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवू शकतो,” असे त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad

#

Pages