😱पुण्यात इन्फोसिस कंपनीतील आयटी अभियंत्याची आत्महत्या.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, April 28, 2020

😱पुण्यात इन्फोसिस कंपनीतील आयटी अभियंत्याची आत्महत्या..


😱 पुण्यात इन्फोसिस कंपनीतील आयटी अभियंत्याची आत्महत्या..
देशात सर्वत्र लॉकडाउन असून अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम च्या सूचना दिल्या आहेत. मात्र घरात बसून अनेक जण नैराश्यात जात आहेत. पुण्यातील वाकड येथील एका अभियंत्याने अशातूनच इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. वाकड परिसरात आयटी अभियंत्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास घडली असून प्रसून कुमार झा ( २८, रा. लॉरेल सोसायटी, वाकड) असे आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार,
प्रसून कुमार झा हे हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीत कामाला होते. ते मूळचे बिहार येथील असून मागील काही वर्षांपासून वाकड येथे राहत होते. दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. झा यांचा विवाह निश्चित झाला होता. त्यातील काही वादातून त्यांनी आत्महत्या केली का, याची पडताळणी पोलिसांकडून सुरू असून, वाकड पोलिस तपास करीत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages